एक्स्प्लोर

करुणानिधी अनंतात विलीन, मरिना बीचवर अंत्यसंस्कार

करुणानिधी हे त्यांच्या कारकिर्दीत 12 वेळा आमदार म्हणून निवडून आले. तसेच, त्यांनी तामिळनाडू राज्याचं पाचवेळा मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे.

चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी अनंतात विलीन झाले. करुणानिधी यांच्या पार्थिवावर चेन्नईच्या मरिना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. करुणानिधी यांचं काल (7 ऑगस्ट) निधन एम. करुणानिधी यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. 28 जुलै रोजी करुणानिधी यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच काल (7 ऑगस्ट) संध्याकाळी 6.10 वाजता कावेरी रुग्णालयात करुणानिधींनी अखेरचा श्वास घेतला. कावेरी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी पत्रक काढून, करुणानिधी यांच्या निधनाची माहिती दिली. करुणानिधी हे त्यांच्या कारकिर्दीत 12 वेळा आमदार म्हणून निवडून आले. तसेच, त्यांनी तामिळनाडू राज्याचं पाचवेळा मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. सिनेमा ते सीएम... करुणानिधी यांचा राजकीय प्रवास चित्रपटांपासून सुरु होऊन मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचलेला करुणानिधी यांचा प्रवास अत्यंत रंजक आहे. चित्रपटातून राजकारणाकडे वळण्याचा ट्रेण्ड दक्षिण भारतात जुना आहे. करुणानिधी यांनी तामिळ मनोरंजनविश्वात नाटककार आणि पटकथा लेखक म्हणून काम केलं आहे. करुणानिधींच्या चाहत्यांनी त्यांना 'कलैनर' हे नाव बहाल केलं आहे. कलैनर म्हणजे तामिळ भाषेत कलेतील विद्वान. करुणानिधी पाच वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत, तर बारा वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. भारतीय राजकारणात करुणानिधी यांना अनन्यसाधारण स्थान आहे. बालवयात राजकारणात प्रवेश करुणानिधी यांनी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. दक्षिण भारतातील हिंदी विरोधी आंदोलनात ते सहभागी झाले होते. 1937 मध्ये शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य केल्याने युवकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. करुणानिधी यांनी तामिळ भाषेतच नाटकं लिहिण्यास सुरुवात केली. तामिळ भाषेवरील त्यांचं प्रभुत्व पाहून सामाजिक नेते पेरियार आणि द्रमुकचे तत्कालीन प्रमुख अन्नादुराई यांनी त्यांना 'कुदियारासु' वाहिनीचे संपादक केलं. पेरियार आणि अन्नादुराई यांच्यात मतभेद झाल्यानंतर करुणानिधी अन्नादुराई यांच्यासोबत गेले. त्यानंतर करुणानिधींना मागे वळून पहावं लागलं नाही. नेहरु पंतप्रधान असताना पहिल्यांदा आमदार तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील कुलिथालाई विधानसभा क्षेत्रातून करुणानिधी 1957 साली पहिल्यांदा निवडून आले. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरु भारताचे पंतप्रधान होते. करुणानिधी 1961 मध्ये द्रमुकचे कोषाध्यक्ष झाले. 1962 मध्ये ते तामिळनाडू विधानसभेत विरोधीपक्षाचे उपनेते झाले. 1967 मध्ये द्रमुक सत्तेत येताच त्यांना सार्वजनिक कार्यमंत्री झाले. द्रमुकची धुरा करुणानिधी यांनी 1969 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच वर्षी द्रमुकचे संस्थापक सीएन अन्नादुराई यांचं निधन झाल्यावर पक्षाचं नेतृत्व करुणानिधींकडे सुपूर्द करण्यात आलं. करुणानिधी पहिल्यांदा (1969) आणि दुसऱ्यांदा (1971) तामिळनाडूचे सीएम झाले, त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांनी तिसऱ्यांदा (1989) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा राजीव गांधी पीएम होते. चौथ्यांदा (1996) करुणानिधी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले, तेव्हा नरसिम्हा राव पंतप्रधानपदी होते. पाचव्यांदा (2006) करुणानिधींनी तामिळनाडूचं मुख्यमंत्रिपद स्वीकारलं तेव्हा देशाची धुरा मनमोहन सिंग यांच्या खांद्यावर होती. कौटुंबिक जीवन करुणानिधी यांचं तीन वेळा लग्न झालं. त्यांची पहिली पत्नी पद्मावती यांचं निधन झालं. एमके मुथू हे त्यांचे सुपुत्र. दुसरी पत्नी दयालु अम्माल यांच्यापासून एमके अलागिरी, एमके स्टॅलिन, एमके तमिलरासू हे पुत्र आणि सेल्वी ही कन्या आहे. तिसरी पत्नी रजति अम्मालपासून कनिमोळी ही कन्या आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed:सरपंच हत्येप्रकरणी Krushna Andhale फरार,मात्र कृष्णाच्या गँगची गुंडगिरी,होमगार्ड जवानाला मारहाणJob Majha:भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी 06 Feb 2025Ajit Pawar AK 47 Funny : महायुतीच्या बातम्या नीट द्या...नाहीतर उडवून टाकू! दादांची फटकेबाजीKaruna Sharma : मुंडे घराण्याचा एकमेवं वारस बेरोजगार आहे,करुणा शर्मांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
Shreyas Iyer : 11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
Video: आया रे तुफान...  सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Video: आया रे तुफान... सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Nashik Crime : पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' जिंकतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' पटकावतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
Embed widget