एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'आयएनएक्स मीडिया' : चिदंबरम आणि कार्तिकडून 'सत्ताबाजार' , सरकारी बाबूंनाही केलं 'मॅनेज'

'आयएनएक्स मीडिया' घोटाळा प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)तर्फे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, त्यांचे पुत्र कार्ति यांच्यासह एकूण १४ जणांविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे. सदर आरोपपत्रात पी. चिदंबरम यांच्यावर भ्रष्टाचार, फसवणूक आणि घोटाळ्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे पुत्र कार्ति यांनी 'आयएनएक्स मीडिया'ला मदत करण्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांनाही गळाला लावलं. कार्तिनं 'आयएनएक्स'कडूनही १० लाख रूपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचं समोर येतंय.

नवी दिल्ली (एएनआय): 'आयएनएक्स मीडिया' घोटाळा प्रकरणी दोन वर्षांपूर्वी सीबीआयनं हे प्रकरण दाखल करून घेतलं. दोन वर्षांच्या तपासानंतर आता या प्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणातील एकूण चौदा आरोपींमध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, कार्ति चिदंबरम, त्याचा अकाऊंटंट, आयएनएक्स मीडिया, या कंपनीचा माजी संचालक पीटर मुखर्जी, दोन अन्य कंपन्या आणि काही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आयएनएक्स मीडियाची माजी संचालक इंद्राणी मुखर्जी ही माफीचा साक्षीदार ठरल्यानं तीचे नाव या केसमधून वगळण्यात आले आहे. येत्या २१ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची दखल विशेष न्यायालयाद्वारे घेण्यात येईल. परकीय गुंतवणूक प्रोत्सहन मंडळ (एफआयपीबी)मार्फत 'आयएनएक्स मीडिया प्रा. लि.' आणि 'आयएनएक्स न्यूज प्रा. लि.'ला मान्यता मिळावी, यासाठी पीटर आणि इंद्राणी यांनी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक इथे पी. चिदंबरम यांची भेट घेतली होती. या भेटीत चिदंबरम यांनी मुखर्जी दाम्पत्याकडे बेकायदेशीर मागण्या केल्याचं या आरोपपत्रातून समोर आलंय. याशिवाय, आपला मुलगा कार्ति चिदंबरम याचे व्यावसायिक हितसंबंध जपण्याचीही अपेक्षा चिदंबरम यांनी मुखर्जी दाम्पत्याकडे व्यक्त केली. 'आयएनएक्स मीडिया' या कंपनीतील पैशांच्या स्रोतांबद्दल चिदंबरम यांच्याकडे भाजप नेते मुरलीमनोहर जोशी आणि अविनाश राय खन्ना यांनी तक्रारी दाखल करूनही, चिदंबरम यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही सीबीआयनं या आरोपपत्रात म्हटलं आहे. २००७मध्ये 'आयएनएक्स मीडिया' या कंपनीला अर्थमंत्री असताना 'एफआयपीबी'द्वारे अवैध मार्गानं ३०५ कोटी रूपये मिळवून दिल्याच्या आरोपाखाली चिदंबरम यांना गेल्या ऑगस्टमध्ये सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. सध्या चिदंबरम तिहार जेलमध्ये आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Embed widget