Heat Wave: कर्नाटकातील 'रॅन्चो'ची कमाल, उष्णतेपासून बचाव होण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल
Heat Wave: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उष्णतेची लाट आल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Heat Wave: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उष्णतेची लाट आल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सूर्याचा यूव्ही इंडेक्स धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यानं सूर्याच्या अतीनील किरणांची तीव्रता वाढली असल्याचं हवामान विभागाच्यावतीनं सांगण्यात आलंय. नुकतंच उष्णतेमुळं जळगाव जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं प्राण गमवल्याची घटना घडली आहे. याच पार्श्वभूमीवर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कर्नाटकच्या एका व्यक्तीनं अनोखी शक्कल लढवली आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी या व्यक्तीनं चक्क पंख्याची टोपी बनवली आहे. या संदर्भात एएनआय वृत्त संस्थेनं माहिती दिली आहे.
एएनआय वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकातील एका व्यक्तीनं पंख्याची टोपी बनवल्याची माहिती देण्यात आली आहे. एएनआयनं या व्यक्तीचा व्हिडिओही शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती हा त्यानं बनवलेल्या टोपीबाबत सांगताना दिसत आहे. कलबुर्गीमध्ये उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी एका व्यक्तीने अनोखी पंख्याची टोपी बनवली आहे. "मार्चपासून उष्णता वाढत आहे, उष्णतेचा कहर पाहता या टोपीवर सोलार लावून पंखा लावण्यात आलाय. ही टोपी घातल्याशिवाय तो घराबाहेरचं पडत नसल्याचं त्या व्यक्तीनं सांगितलं आहे.
एएनआयचं ट्वीट-
महाराष्ट्रातही उष्णतेची लाट
विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. राज्यातील तापमान 44 अंशापार गेलंय. चंद्रपुरात सर्वाधिक 44.2 अंश सेल्सियस तापामानाची नोंद झालीय. चंद्रपुरात गेल्या 50 वर्षात मार्च महिन्यातील हे सर्वात उच्चांकी तापमान ठरलंय. तर, अकोल्यातील तापमान 43.2 अंश सेल्सिअवर पोहोचलंय. पुढचे काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. दुपारच्या वेळेत अतीनील किरणांची तीव्रता अधिक असल्यानं पुढील किमान चार दिवस दुपारच्या उन्हात जाणं टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.
हे देखील वाचा-
- Heatstroke Death : वाढत्या गर्मीमुळे नागरिक हैराण, जळगाव जिल्ह्यात उष्मा घाताचा पहिला बळी
- Maharashtra Heat Wave : मराठवाडा विदर्भासह राज्यात उष्णतेच्या लाटेचा धोका ABP Majha
- Maharashtra Temperature Special Report: पारा वाढतोय, आणि धोकाही...घरीच थांबा ABP Majha
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha