एक्स्प्लोर
Advertisement
भाऊ दिसतो लय भोळा, पण नाद लय खुळा, बायकोला जेसीबीच्या बकेटमधून घरी आणलं!
नवरा नवरी बाशिंग बांधून, लग्नाच्या पोशाखात जेसीबी मशीनच्या बकेटमध्ये बसल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या फोटोसोबत अनेक मेसेजही फॉरवर्ड होत आहेत.
बंगळुरु: लग्नमंडपातून नव्या नवरीला गाडी, घोडा, बाईक किंवा हेलिकॉप्टरमधून घरी नेल्याचे आपण ऐकलं आहे. मात्र कर्नाटकातील एका पठ्ठ्याने नव्या नवरीला चक्क जेसीबी मशीनच्या बकेटमधून घरी आणलं.
कर्नाटकातील दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील पुत्तूर जवळच्या संतयार गावात हा प्रकार पाहायला मिळाला.
नवरा नवरी बाशिंग बांधून, लग्नाच्या पोशाखात जेसीबी मशीनच्या बकेटमध्ये बसल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या फोटोसोबत अनेक मेसेजही फॉरवर्ड होत आहेत.
जसे की - झाली ती #हवा, कडक रे #भावा , तुच आहेस #छावा ,भावाची #हवा , आता तर DJ च #लावा अशाप्रकारचे मेसेज आणि जोक फिरत आहेत.
नवरदेव जेसीबी ऑपरेटर
खरंतर हा नवरदेव जेसीबीचालक आहे. चेतन असं या नवरदेवाचं नाव आहे. चेतनचं लग्न 18 जून रोजी झालं. चेतनचं जेसीबीवर नितांत प्रेम आहे. त्यामुळे जेसीबीलाही आपल्या लग्नाचा हिस्सा बनवायची इच्छा चेतनची होती.
त्यामुळे चेतनने आपल्या नव्या नवरीला जेसीबीच्या सीटवर नव्हे तर पुढच्या बकेटमध्ये बसवलं. तो स्वत:ही त्यामध्ये बसला. या जेसीबीला फुले आणि फुग्यांनी सजवण्यात आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement