एक्स्प्लोर
कर्नाटक: भाजप आज सत्ता स्थापनेचा दावा करणार
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018: कर्नाटकात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 बंगळुरु: अत्यंत रंगतदार परिस्थितीनंतर कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 जाहीर झाला आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी मतदान झालं होतं.
यामध्ये भाजपने सर्वाधिक 104 जागा मिळवल्या होत्या. मात्र तांत्रिक घोळामुळे एका जागेचा निकाल रद्द करण्यात आला. पण पुन्हा त्याबाबतची खातरजमा केल्यानंतर, भाजपने जिंकलेली ही जागा त्यांच्याच पारड्यात पडली.
भाजपच्या कर्नाटकातील हुबळी-धारवाडच्या विजयी उमेदवाराचा निकाल रद्दबातल करण्यात आला होता. मतमोजणीनुसार जगदीश शेट्टार हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र, ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅटमधील तांत्रिक बिघाडामुळे निवडणूक आयोगानं हा निकाल रद्द करत राखून ठेवला होता. अखेरी मध्यरात्री जगदीश शेट्टार यांनाच विजयी घोषित करण्यात आलं.
त्यामुळे भाजपचं संख्याबळ 104 झालं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018
- भाजप 104
- काँग्रेस 78
- जनता दल (सेक्युलर) 37
- बहुजन समाज पार्टी 1
- कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
- अपक्ष 1
- भाजप 104
- काँग्रेस 78
- जनता दल (सेक्युलर) 37
- बहुजन समाज पार्टी 1
- कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
- अपक्ष 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement