एक्स्प्लोर
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना मेटाकुटीला आणणारा बदामी मतदारसंघ
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल: श्रीरामुलू हे बल्लारी मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत आणि भाजपचे तगडे नेते मानले जातात.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल बंगळुरु: कर्नाटकातील लक्षवेधी लढतींपैकी एक म्हणजे बदामी मतदारसंघातील लढत.
इथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भाजपच्या श्रीरामुलू यांनी आव्हान दिलं. श्रीरामुलू हे बल्लारी मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत आणि भाजपचे तगडे नेते मानले जातात.
सुषमा स्वराज बल्लारीतून सोनिया गांधींविरोधात उभ्या होत्या, तेव्हा श्रीरामुलू चर्चेत आले, पुढे मोठे झाले. खाण प्रकरणातील रेड्डी ब्रदर्सचे ते विश्वासू मानले जातात. त्यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात उतरवून भाजपने प्रतिष्ठेची लढत बनवली.
या मतदारसंघात श्रीरामुलू यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना मेटाकुटीला आणलं. श्रीरामुलूंचा निसटता पराभव झाला. सिद्धरामय्या केवळ 2150 मतांनी जिंकले.
इथे सिद्धरामय्या यांना जनता दल सेक्युलरच्या हनुमंथा यांचे आभार मानावे लागतील. कारण सिद्धरामय्या यांना 64,022 हजार मतं पडलीत तर भाजपच्या श्रीरामुलू यांना 60,335 मतं आहेत. मात्र जनता दल सेक्युलरच्या उमेदवाराने तब्बल 23,067 मतं घेतली आहेत.
या दोघांच्या मतांची बेरीज सिद्धरामय्यांपेक्षा 20 हजारांनी जास्त आहे. थोडक्यात या मतविभागणीचा सरळ फायदा सिद्धरामय्यांना झाला. अखेरपर्यंत ही लढत अटीतटीची झाली.
सिद्धरामय्या दुसऱ्या चामुंडेश्वरी मतदारसंघातूनही लढत आहेत, तिथे ते हरल्यात जमा आहेत. जनता दल सेक्युलरचे जी टी देवेगौडा 30 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
श्रीरामुलू सुद्धा दुसऱ्या मोलाकलमुरु मतदारसंघातून लढत आहेत तिथे ते आरामात जिंकतील अशी चिन्ह आहेत, तिथे ते काँग्रेस उमेदवारापेक्षा 22 हजारांनी आघाडीवर आहेत.
संबंधित बातम्या
स्पेशल रिपोर्ट : कर्नाटकातील सर्वात लक्षवेधी ‘बदामी’ची लढाई
‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो : राज ठाकरे
राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री
कर्नाटक 'काँग्रेसमुक्त', देशातील 21 व्या राज्यातही कमळ फुललं
कर्नाटक निवडणूक निकाल 2018 : लिंगायतांनी काँग्रेसला नाकारलं!
बेळगाव निवडणूक निकाल 2018 लाईव्ह अपडेट : 18 जागांचे निकाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement