एक्स्प्लोर
दुसऱ्या पत्नीची डोक्यात कुकर घालून हत्या, पतीची आत्महत्या
कानपूरच्या कल्याणपूर भागात मोहम्मद शहवान आयआयटी कोचिंग क्लासेस चालवत होता. तिथेच तो पत्नी नमरासोबत राहत होता. शहवानच्या घरी सापडलेल्या डायरीतून पोलिसांना अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे.
कानपूर : दुसऱ्या पत्नीची हत्या करुन आत्महत्या करणाऱ्या कानपूरमधील पतीबाबत अनेक गुपितं आता समोर येत आहेत. पहिल्या बायकोला घटस्फोट दिल्यानंतर मोहम्मद शहवानने दुसरा निकाह केला. मात्र दुसऱ्या बायकोसोबतही वारंवार खटके उडत असल्यामुळे शहवानने तिचा काटा काढून स्वतःलाही संपवलं.
कोचिंग क्लासचा संचालक असलेल्या शहवानने बायको नमरा खानच्या डोक्यात प्रेशर कुकर घालून तिचा जीव घेतला. शहवानचा भाऊ इरफान मंगळवारी त्यांच्या घरी पोहचला, तेव्हा नमरा त्याला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसली. याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली. त्याच वेळी 40 किलोमीटरवर स्वतःच्या गाडीतच विष पिऊन शहवानने आत्महत्या केली. पोलिसांना तो गाडीत बेशुद्धावस्थेत आढळला. रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
कानपूरच्या कल्याणपूर भागात मोहम्मद शहवान आयआयटी कोचिंग क्लासेस चालवत होता. तिथेच तो पत्नी नमरासोबत राहत होता. शहवानच्या घरी सापडलेल्या डायरीतून पोलिसांना अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे.
'सप्टेंबर 2016 मध्ये नमरा माझ्या आयुष्यात आली होती. मी तिला माझ्या बायको-मुलांबद्दल सांगितलं. तिच्या सांगण्यावरुन मी पहिली पत्नी समरानाला घटस्फोट दिला. 21 जुलै 2018 ला आम्ही लग्न केलं. कुटुंबीयांना नंतर याविषयी सांगितलं.' असं शहवानने डायरीत लिहिलं आहे.
'लग्नानंतर माझा मुलगा माझ्यासोबत राहत होता. मात्र नमरा त्याला मारहाण करायची. नाईलाजाने मला त्याला आमच्यापासून लांब पाठवावं लागलं.' असं लिहितानाच शहवानने नमरा अनेक तरुणांशी बोलत असल्याचा उल्लेख केला आहे. 'मला रोजची भांडणं सहन होत नाहीत. माझ्या मृत्यूनंतर माझी संपत्ती पहिली पत्नी आणि मुलांना द्यावी' असंही शहवानने सांगितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement