एक्स्प्लोर
भुकेल्या शेळीने मालकाचे 66 हजार रुपये खाल्ले, शेळीसोबत सेल्फीसाठी गर्दी
लखनौ : उत्तर प्रदेशातील कन्नोज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे. भुकेलेल्या शेळीने मालकाच्या खिशातील 66 हजार रुपये खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
कन्नोज जिल्ह्यातील सिलुआपूर गावातील ही घटना आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार शेळीचे मालक सर्वेश कुमार पँटच्या खिशात 66 हजार रुपये ठेवून अंघोळीसाठी गेले. त्याच वेळेत शेळीने हे पैसे खाल्ले. विटांची खरेदी करण्यासाठी सर्वेश कुमार यांनी हे पैसे आणले होते.
पैसे पँटच्या खिशात ठेवलेले होते. शेळी या प्रकारचे कागद खात असते, त्यामुळेच या पैशांवर नजर जाताच तिने ते कागद समजून खाल्ले. मात्र आता काहीही करु शकत नाही. शेळीने 2 हजार रुपयांच्या 31 नोटा चावून खाल्ल्या, अशी माहिती सर्वेश कुमार यांनी दिली.
या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर लोकांनी शेळीला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे काहींनी तर शेळीसोबत सेल्फीही घेतला.
दरम्यान या घटनेनंतर शेळीचे मालक सर्वेश कुमार यांना वेगवेगळे सल्ले देण्यात आले. शेळीला जनावरांच्या डॉक्टरांकडे नेऊन उलटीचं औषध द्या, जेणेकरुन पैसे बाहेर येतील, किंवा पैसे खाणाऱ्या शेळीला कसायाच्या हवाली करा, नाहीतर शेळीला पोलिसांच्या हवाली करा, असे सल्ले लोकांनी दिल्याचं सर्वेश कुमार यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement