एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

उद्ध्वस्त देवभूमीतील देव! ओळख लपवून कलेक्टरने चिखल-गाळ काढला!

उद्ध्वस्त देवभूमीला पूर्ववत करण्यासाठी अनेक मदतीचे हात आले. मात्र एक देवदूत असा होता, जो ओळख लपवून केरळ अर्थात देवभूमीतील चिखळ-गाळ काढत होता.

नवी दिल्ली:  प्रचंड पाऊस आणि पूर यामुळे उद्ध्वस्त झालेलं केरळ हळूहळू सावरत आहे. केरळला सावरण्यासाठी देशातूनच नव्हे, तर जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला. अनेकांनी रोख रकमेसह, धान्य, कपडे आणि विविध उपयोगी वस्तूंचा पुरवठा केला. तर काहींनी प्रत्यक्ष केरळमध्ये जाऊन मलबा हटवणं, गाळ उपसणं, पाणी बाहेर काढणं, वैद्यकीय मदत करणं अशी विविध कामं केली. उद्ध्वस्त देवभूमीला पूर्ववत करण्यासाठी अनेक मदतीचे हात आले. मात्र एक देवदूत असा होता, जो ओळख लपवून केरळ अर्थात देवभूमीतील चिखळ-गाळ काढत होता. निस्वार्थ भावनेने काम करणारा ही कोणी साधासुधी व्यक्ती नव्हती, तर तो एक IAS होता. कन्नन गोपीनाथन असं या आएएस अधिकाऱ्याचं नाव आहे. कन्नन गोपीनाथन महत्त्वाचं म्हणजे मूळचे केरळचे असलेले कन्नन गोपीनाथन हे दादरा नगर हवेलीचे जिल्हाधिकारी आहेत. पण केरळ संकटात असल्याचं समजताच, कन्नन गोपीनाथन यांनी वैयक्तिक कारण देत अधिकृत रजा घेऊन केरळ गाठलं. इथे त्यांनी स्वत:ची ओळख लपवून मदतकार्य केलं. शर्टवर धूळ उडाली तरी चारवेळा अंग झाडणारे अधिकारी आपल्या आसपास दररोज पाहायला मिळतात. मात्र त्याचवेळी चिखलात उतरुन गाळ काढणारा  IAS दर्जाचा निस्वार्थ अधिकारी केरळवासियांनी पाहिला. 8 दिवस मदत कन्नन गोपीनाथन हे मूळचे केरळमधील कोट्ययमचे रहिवासी आहेत. 2012 मध्ये ते आयएएस झाले. केरळला पुराने वेढल्याचं समजताच, हळव्या मनाच्या कन्नन यांना राहावलं नाही. त्यांनी वैयक्तिक कारण देत थेट कामावर रजा टाकून दादरा नगर हवेलीवरुन केरळकडे कूच केली. केरळमध्ये ते स्वत:च्या शहरात कोट्ययमला आले. त्यांनी त्यांच्यापरिने शक्य ती सर्व मदत, पडेल ते काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी कोणालाही आपण आयएएस आहोत हे सांगितलंच नाही. एक आयएएस असूनही गोपीनाथन यांनी लोकांच्या घराची सफाई केली, चिखल-गाळ काढला, अनेकांना पुरातून बाहेर काढलं. पुरात अडकलेल्या लोकांना एकत्र करुन, स्वयंसेवी संस्था आणि सरकारकडून होणारी मदत मिळवून दिली. तसंत सरकारी मदत कशी मिळवावी, याचं मार्गदर्शन केलं. अलपुझा आणि एर्नाकुलममध्ये तर त्यांनी मोठं काम केलं. उद्ध्वस्त देवभूमीतील देव! ओळख लपवून कलेक्टरने चिखल-गाळ काढला! 5 जिल्ह्यात बसने फिरले, पडेल ती मदत केली. कुठे ट्रकमधून सामान भरण्यास/उतरवायला, कुठे दुभाषी म्हणून काम केलं. कुणी विचारलं तर NGO साठी काम करतोय असं सांगायचे. मजेशीर बाब म्हणजे कन्नन गोपीनाथन यांनी जिथे काम केलं अशा अनेक छावण्यांचे प्रभारी त्यांचे बॅचमेट होते. त्यांनाही कन्नन काम करतायत हे माहिती नव्हतं. केरळमध्ये स्वत: जनसेवा करत असताना, त्यांनी दादरा नगर हवेली प्रशासनातर्फे 1 कोटीचा चेक केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. ओळख कशी झाली? कन्नन गोपीनाथन हे झोकून देऊन काम करत होते. त्यांना कोणी राजकीय कार्यकर्ता संबोधलं, कोणी स्वयंसेवी संस्थेचा माणूस तर कोणी काय काय नावं दिली. पण गोपीनाथन यांनी आपण कोण आहोत हे सांगितलं नाही. उद्ध्वस्त केरळच्या जखमा भरणं या एकमेव ध्येयाने गोपीनाथन यांचं काम सुरु होतं. त्याचवेळी एका प्रेस सेंटरमध्ये एर्नाकुलमचे कलेक्टर आले होते. तिथे त्यांना काम करत असणारी व्यक्ती दिसली. ती व्यक्ती कन्नन गोपीनाथन  यांच्यासारखी वाटल्याने एर्नाकुलमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जवळ जाऊन चौकशी केली असता, ते कन्ननच असल्याचं समजलं. एर्नाकुलमच्या कलेक्टरने कन्नन यांची ओळख करुन दिली आणि उपस्थित सर्वजण अवाक् झाले. इतके दिवस आपण ज्यांच्यासोबत काम करत आहोत, तो एक सीनियर आयएएस ऑफिसर आहे हे त्यांना तेव्हा समजलं. केवळ माणुसकीच्या नात्याने, निस्वार्थ भावनेने उद्ध्वस्त केरळला बाहेर काढण्यासाठी झटणाऱ्या IAS कन्नन गोपीनाथन यांना उपस्थितांनी एक कडक सॅल्युट ठोकला. त्यांच्या या कामाचं आयएएस असोसिएशननेही कौतुक केलं. आयएएस कन्नन गोपीनाथन यांची ही कहाणी सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. शेअर करणारा प्रत्येक जण कन्नन यांच्या कार्याला सलाम करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole PC : निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आम्हाला संशय, नाना पटोलेंचे आयोगावर गंभीरआरोपABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Embed widget