एक्स्प्लोर
अमित शाहांच्या 'एक राष्ट्र एक भाषे'बाबतच्या वक्तव्यानंतर कमल हासन यांची संतप्त प्रतिक्रिया
हिंदी दिनानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या भाषणात एक राष्ट्र एक भाषेला प्रोत्साहन देण्यासंदर्भात वक्तव्य केले. या विधानाचा देशभरातील लोकांनी, नेत्यांनी समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली : हिंदी दिनानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या भाषणात एक राष्ट्र एक भाषेला प्रोत्साहन देण्यासंदर्भात वक्तव्य केले. या विधानाचा देशभरातील लोकांनी, नेत्यांनी समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. दक्षिणेतल्या राजकीय पक्षांनी त्याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तमिळनाडूमधील मक्लल नीधी मैय्यमचे नेते आणि अभिनेते कमल हासन यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. नाव न घेता हासन यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. हासन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, 1950 साली भारत देश विविधतेत एकात्मतेच्या वचनावर लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित झाले आहे. आता कोणताही शाह, सुल्तान किंवा सम्राट ही बाब नाकारु शकत नाही. कमल हासन म्हणाले की, मी सर्व भाषांचा सन्मान करतो. परंतु माझी मातृभाषा तमिळ आहे आणि राहील. हासन एवढ्यावरच थांबले नाहीत. अधिक आक्रमक होत ते म्हणाले की, पुन्हा एकदा भाषेसाठी आंदोलन करावं लागलं तर ते आम्ही करु. यावेळी जे आंदोलन होईल ते जलिकट्टू आंदोलनापेक्षाही मोठं असेल.
Now you are constrained to prove to us that India will continue to be a free country.
You must consult the people before you make a new law or a new scheme. pic.twitter.com/u0De38bzk0 — Kamal Haasan (@ikamalhaasan) September 16, 2019
🇮🇳Oriya 🇮🇳 Marathi 🇮🇳 Kannada 🇮🇳Hindi 🇮🇳Tamil 🇮🇳English 🇮🇳Gujarati 🇮🇳Bengali 🇮🇳Urdu 🇮🇳Punjabi 🇮🇳 Konkani 🇮🇳Malayalam 🇮🇳Telugu 🇮🇳Assamese 🇮🇳Bodo 🇮🇳Dogri 🇮🇳Maithili 🇮🇳Nepali 🇮🇳Sanskrit 🇮🇳Kashmiri 🇮🇳Sindhi 🇮🇳Santhali 🇮🇳Manipuri... India’s many languages are not her weakness.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 16, 2019
आणखी वाचा























