एक्स्प्लोर
Advertisement
मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार?
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच उज्जैनमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते.
भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. नुकत्याच झालेल्या काही सर्वेक्षणांमधून मध्य प्रदेशमध्ये सत्तांतराची शक्यता वर्तवली गेलीय. त्यामुळे अर्थात काँग्रेसने आणखी जोमाने काम सुरु केलं आहे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे हे सुद्धा विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे.
भोपाळमध्ये काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ज्योतिरादित्य शिंदेंना विधानसभा निवडणूक लढण्यासंदर्भात प्रश्न विचारला गेला, त्यावेळी त्यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात नकार दिला नाही. ते म्हणाले, “पक्ष ठरवेल मी काय करायला हवे ते, जिथून ठरवलं जाईल, तिथून निवडणूक लढवेन.”
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच उज्जैनमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवलीच, तर तेच मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. ज्योतिरादित्य हे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. शिवाय, त्यांना राजघराण्याची पार्श्वभूमीसुद्धा आहे. त्यांची लोकप्रियता मोठी आहे.
एबीपी न्यूज आणि सी व्होटरने केलेल्या ओपिनियन पोलनुसार मध्य प्रदेशातील स्थिती कशी असेल?
एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, मध्य प्रदेश भाजपच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. इथे भाजपला 40 टक्के, काँग्रेस 42 टक्के आणि इतरांना 18 टक्के मतं मिळताना दिसत आहेत.
एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. एकूण 230 जागांपैकी काँग्रेसला 117, भाजप 106 आणि इतर पक्षांना सात जागा मिळत आहेत.
मध्य प्रदेशातील सद्यपरिस्थिती?
मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 आणि लोकसभेच्या 29 जागा आहेत. 2013 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 165 आणि काँग्रेसने 58 जागा मिळवल्या होत्या. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 29 पैकी 27 जागांवर विजय मिळाला. शिवराज सिंह चौहान 29 नोव्हेंबर 2005 साली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. त्यांच्यापूर्वी बाबूलाल गौर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement