IndiGo Flight : टेकऑफ आधीच इंडिगोचं विमान धावपट्टीवरून घसरलं, चाकं चिखलात रुतल्यानं विमानाचं उड्डाण रद्द
IndiGo Flight : या घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. हे विमान आसाममधील जोरहाट येथून कोलकातासाठी रवाना होणार होतं.
Jorhat Kolkata IndiGo Flight : टेकऑफ आधीच इंडिगोचं विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आसाममध्ये घडली आहे. आसाममधील जोरहाट येथून कोलकातासाठी विमान रवाना होणार होतं. दरम्यान, विमान टेकऑफ करण्याआधीच धावपट्टीवरून घसरलं, त्यानंतर विमान चिखलात अडकलं. यामुळे नंतर विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं. विमाल धावपट्टीवरून घसरून शेजारी असलेल्या चिखलात अडकलं, यामुळे आधी उड्डाणाला उशीर झाला. त्यानंतरही विमानाची चाकं चिखलातून बाहेर न आल्याने उड्डाण रद्द करण्यात आलं.
गुरुवारी आसाममधील जोरहाट येथून कोलकालासाठी 6E757 हे विमान उड्डाण घेणार होते. पण विमान टेकऑफआधीच धावपट्टीवर घसरलं आणि किनारी असलेल्या चिखलात गेलं. विमान चिखलात बराच वेळ फसून होतं. विमान पुन्हा धावपट्टीवर नेत टेकऑफ करण्यासाठी पायलटकडून प्रयत्न सुरु होते. पण विमान चिखलात रुतलं होतं, सुमारे दोन तास विमान थांबवल्यानंतर हे उड्डाण अखेर रद्द करण्यात आलं.
दरम्यान, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. हे विमान धावपट्टीवरून पुन्हा परतलं.उड्डाण रद्द झाल्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. टेकऑफ करताना विमान धावपट्टीवरून घसरून चिखलात उडकल्यानं शेवटी हे उड्डाण रद्द करण्यात आलं.
मागील काही दिवसांमध्ये अनेक विमानांचं इमर्जन्सी लँडिंग
गेल्या काही दिवसांमध्ये इंडिगोच्या अनेक विमानांचं इमर्जन्सी लँडिंग झालं आहे. तांत्रिक बिघाडामुळे दोन विमानांचं पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. एका विमानाचं 05 जुलै रोजी तर दुसऱ्या एका विमानाचं 17 जुलै रोजी पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
तांत्रिक बिघाडाच्या वाढत्या घटना
गेल्या दोन महिन्यांमध्ये विविध विमान कंपन्यांच्या विमानांमधील तांत्रिक बिघाडाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याची दखल घेत DGCA ने या घटनांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Indigo Airlines: इंडिगो विमानाची कराचीत एमर्जन्सी लँडिग; काही दिवसातील दुसरी घटना
- Indigo Airlines : इंडिगोचे बहुतांशी कर्मचारी अचानकपणे सुट्टीवर, विमान वाहतूक विस्कळीत; झाला 'हा' मोठा खुलासा
- Trending : पायलट आई-मुलाच्या जोडीने विमान उडवत घेतली गगनभरारी! मुलाची आईबद्दल कृतज्ञता व्यक्त; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल