Indigo Airlines: इंडिगो विमानाची कराचीत एमर्जन्सी लँडिग; काही दिवसातील दुसरी घटना
Indigo Airlines : इंडिगो विमानाचे पाकिस्तानमधील कराची विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. काही दिवसांपूर्वी स्पाइस जेट विमानाचे ही कराचीत लँडिंग करण्यात आले होते.
Indigo Airlines पाकिस्तानमधील कराचीत इंडिगो विमानाला एमर्जन्सी लँडिंग (Indigo Airlines Emergency Landing) करावी लागली. हे विमान शारजाहून हैदराबाद येथे होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात काही तांत्रिक बिघाड उद्भवल्याने विमानाची एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने हैदराबाद येथे आणण्यात येणार आहे. मागील दोन आठवड्यात दुसऱ्यांदा भारतीय विमानाला कराचीत एमर्जन्सी लँडिंग करावी लागली.
इंडिगो एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, शारजा-हैदराबाद विमानात पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाला कराचीच्या दिशेने वळवण्यात आले. या विमानातील प्रवाशांना हैदराबाद येथे जाण्यासाठी एका अतिरिक्त विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
IndiGo Sharjah-Hyderabad flight diverted to Pak’s Karachi after pilot reported technical defect in the aircraft which is being examined at the airport.Airline is planning to send another aircraft to Karachi.
— ANI (@ANI) July 17, 2022
This is the 2nd Indian airline to make a landing in Karachi in 2 weeks pic.twitter.com/XbUcgNOzBs
दरम्यान, याआधी 14 जुलै रोजी देखील जयपूरमध्ये इंडिगो विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती.
पाच जुलै रोजी स्पाइसजेट विमानाची कराचीत एमर्जन्सी लँडिंग
पाच जुलै रोजीदेखील स्पाइसजेट विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती. स्पाइसजेटचे हे विमान दिल्लीहून दुबई येथे जात होते. तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाला पाकिस्तानमधील कराचीत लँडिंग करावी लागली.
स्पाइसजेटच्या बोईंग 737 MAX विमानात (SpiceJet's Boeing 737 MAX Aircraft) 5 जुलै रोजी सकाळी इंधन इंडिकेटरमध्ये बिघाड झाल्यानंतर कराची विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग (Unscheduled Landing) करण्यात आले होते. विमानात बिघाड झाल्याचे संकेत मिळताच वैमानिकांनी एमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमानतळावर तपासणी केल्यानंतर विमानात कोणताही बिघाड झाला नसल्याचे समोर आले होते. या विमानात आधी कोणताही बिघाड झाला नाही.