एक्स्प्लोर

आमदारांकडून चुंबन स्पर्धेचं आयोजन, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद

झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे 400 किमी अंतरावर असलेल्या संथाल परगनातील झुमरिया गावात जत्रेदरम्यान काल रात्री आयोजित केलेल्या चुंबन स्पर्धेचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला.

रांची : झारखंडच्या पाकुड जिल्ह्यात पारंपरिक ग्रामीण जत्रेदरम्यान आदिवासी दाम्पत्यासाठी चुंबन प्रतिक्रिया आयोजित केल्याने झारखंड मुक्ती मोर्चाच्या दोन आमदार अडचणीत आले आहेत. सत्ताधारी भाजपने दोन्ही आमदारांच्या निलंबनाची मागणी केली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार सायमन मरांडी म्हणाले की, आदिवासी समाजात वाढत्या घटस्फोटाच्या संख्येला आळा घालण्यासाठी ही चुंबन स्पर्धा आयोजित केली होती. सायमन मरांडी हे संथाल परगनातील लिट्टीपार मतदारसंघाचे आमदार आहेत. या जत्रेत पक्षाचे आमदार स्टीफन मरांडीही उपस्थित होते. झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे 400 किमी अंतरावर असलेल्या संथाल परगनातील झुमरिया गावात जत्रेदरम्यान काल रात्री आयोजित केलेल्या चुंबन स्पर्धेचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये अनेक आदिवासी दाम्पत्य चुंबन घेत असल्याचं दिसत असून तिथे उपस्थित लोक टाळ्या वाजवताना दिसत आहेत. झारखंडमधील भाजपचे उपाध्यक्ष हेमलाल मुर्मू यांनी या प्रकरणी सायमन आणि स्टीफन यांना विधानसभेतून निलंबित करण्याची मागणी केली आहे. "जेएमएमचे आमदार सायमन मरांडी आणि स्टीफन मरांडी यांनी 'हुल मेला' च्या नावावर चुंबन स्पर्धा आयोजित करुन संथाल परगनाच्या संस्कृतीचा अपमान केला आहे. सभागृहातून त्यांचं निलंबन व्हावं, हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात त्यांना सहभागी होऊ देऊ नये," अशी आमची मागणी असल्याचं हेमलाल मुर्मू यांनी सांगितलं. संथल परगनाची संस्कृती अशी नसून हा नारीशक्तीचा अपमान आहे. संथल परगनामध्ये मुलगा आणि मुलगी हातही मिळवत नाहीत. त्यामुळे दोन्ही आमदारांनी माफी मागवी, अशीही मागणी हेमलाल मुर्मू यांनी केली आहे. दुसरीकडे स्पर्धेबाबत विचारलं असता सायमन मरांडी यांनी सांगितलं की, "विवाहित दाम्पत्यामधील नातं अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने 20 दाम्पत्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. संथल समाजाला समजण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही. वाढत्या घटस्फोटाच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं." झारखंडचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते नीलकंठ सिंह मुंडा यांनी हा आदिवासी समाजाचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. विजेत्यांना पुरस्कार दिल्याने निलकंठ सिंह मुंडा यांनी सायमन मरांडी यांच्यावर टीकाही केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget