एक्स्प्लोर

JEE Main 2021 : जेईई मेन्स परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, परीक्षेच्या तारखेतही झाला बदल

जेईई मेन्स परीक्षेच्या तिसऱ्या सेशनसाठीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे.तिसऱ्या आणि चौथ्या सेशनच्या परीक्षेच्या तारखांतही बदल करण्यात आला आहे. 

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्सच्या तिसऱ्या सेशनसाठीच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रक जारी करण्यात आले आहेत. तसेच तिसऱ्या सेशनच्या तारखांमध्ये थोडा बदल करण्यात आला असून त्या आता 20 जुलै, 22 जुलै, 25 जुलै आणि 27 जुलै या तारखांना परीक्षा होणार आहे. चौथ्या सेशनच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असं NTA ने सांगितलं आहे. 

विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र jeemain.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करायचे आहे. या वेबसाईटवर भेट देऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज नंबर, जन्म तारीख आणि सिक्युरिटी पिन नंबर भरायचा आहे. ही माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. 

परीक्षेच्या तारखांमध्ये बदल
या आधी जेईई मेन्सच्या तिसऱ्या सेशनसाठी 20 जुलै ते 25 जुलै दरम्यान परीक्षा घेण्यात येणार होत्या तर चौथ्या सेशनसाठी परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान घेण्यात येणार होती. आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून तिसऱ्या सेशनसाठी आता 20 जुलै, 22 जुलै, 25 जुलै आणि 27 जुलै या तारखांना परीक्षा होणार आहे तर चौथ्या सेशनच्या तारखांची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचं समजतंय.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जेईई मेन्स परीक्षा फेब्रुवारी,मार्च, एप्रिल, मे या चार सेशनमध्ये घेण्याचा निर्णय झाला होता. त्यापैकी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. एप्रिल आणि मे महिन्याच्या म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या सेशनच्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता या परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना यावर्षी जेईई मेन्स 2021 परीक्षेसाठी चार संधी देण्यात आल्या आहेत. ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त होतील त्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

या वर्षी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडण्याची संधी देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सद्याच्या स्थितीत खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राची संख्या सुद्धा पूर्वीपेक्षा दुप्पटीने वाढवली आहे. जेणेकरून कोरोनासंबंधी सोशल डिस्टनसिंग व इतर नियमांचे काटोकोरपणे पालन होईल याची खबरदारी सुद्धा घेण्यात आली आहे

महत्वाच्या बातम्या : 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: काँग्रेसचं सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन...जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांच्या समर्थनार्थ 42 निवृत्त न्यायाधीश-अधिकारी मैदानात, SIR प्रक्रियेचं समर्थन, देशवासियांना खुलं पत्र
ज्ञानेश कुमारांच्या समर्थनार्थ 42 निवृत्त न्यायाधीश-अधिकारी मैदानात, SIR प्रक्रियेचं समर्थन, देशवासियांना खुलं पत्र

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget