एक्स्प्लोर
...अन् खासदार शशिकलांना राज्यसभेतच रडू कोसळलं!
नवी दिल्ली: नेहमीच वाद विवाद, आरोप प्रत्यारोपांच्या गोंधळानं गाजणाऱ्या राज्यसभेत आज एक महिला खासदार बोलता बोलता चक्क रडू लागली.
तमिळनाडूतील AIADMK च्या खासदार असलेल्या शशिकला पुष्पा यांनी राज्यसभेत बोलताना तमिळनाडूत आपण सुरक्षित नसून सतत आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं सांगितलं. पक्ष सोडण्यासाठी आपल्यावर दबाव दिला जातो आहे. असं म्हणत त्यांना राज्यसभेतच रडू कोसळलं.
शशिकला राज्यसभेत बोलत असतानाच तिकडे तमिळनाडूत जयललिता यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
शुक्रवारी दिल्लीतल्या इंदिरा गांधी विमानतळावर शशिकला यांनी डीएमकेचे खासदार तिरुची शिवा यांच्या सलग चार कानाखाली लगावल्या होत्या. त्यांची ही कृती पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याचं सांगत जयललितांनी ही कारवाई केली.
काय आहे नेमकं प्रकरण:
तामिळनाडूमधील एडीएमकेच्या खासदार शशिकला पुष्पा आणि डीएमकेचे खासदार तिरुची शिवा या दोघांमध्ये दिल्ली विमानतळावर वाद झाला.
विमानतळ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन्ही खासदारांची सीट एकाच एअरक्राफ्टमध्ये होती. जेव्हा डीएमकेचे खासदार तिरुची शिवा यांना याबाबत कळलं, तेव्हा त्यांनी शशिकला यांच्यासोबत प्रवास करण्यास नकार दिला आणि एडीएमकेच्या खासदार शशिकला पुष्पा यांना एअरक्राफ्टमधून उतरण्यास सांगितले.
तिरुची शिवा यांच्या या भूमिकेमुळे शशिकला भडकल्या आणि त्यांनी रागाच्या भरात विमानतळावर सर्वांसमोर तिरुची यांच्या श्रीमुखात भडकावली.
त्यानंतर तिरुची यांनी आपला प्रवास रद्द करुन, शशिकला यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी निघून गेले. मात्र, शशिकला चेन्नईच्या दिशेने रवाना झाल्या.
या प्रकरणावर राज्यसभा अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही खासदारांमधील कुणीही याबाबत तक्रार दाखल केली तर त्या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement