एक्स्प्लोर

कोरोनानंतर देशांतर्गत पर्यटनात वाढ, कोची, वाराणसी आणि विशाखापट्टणमला पर्यटकांची सर्वाधिक पसंती

Tourism OYO Report : कोरोना महामारीनंतर संपूर्ण भारतातील देशांतर्गत पर्यटनाला महत्त्वपूर्ण चालना मिळाली आहे. यात जयपूर आणि गोवा विश्रांतीसाठी लोकप्रिय ठिकाणे असून या ठिकाणांना पर्यकांनी जास्त पसंती दिली आहे.

मुंबई : देशातील अनेक ठिकाणांना पर्यंटक पर्यटनासाठी पसंत देत असता. यात जयपूर आणि गोवा विश्रांतीसाठी लोकप्रिय ठिकाणे असून या ठिकाणांना पर्यकांनी जास्त पसंती दिली आहे. शिवाय कोची, वाराणसी आणि विशाखापट्टणम ही भारतातील महत्वाची पर्यटन स्थळे ( Tourism) आहेत. ओयोने नुकताच आपला जागतिक पर्यटन दिन अहवाल (OYO Report) प्रसिद्ध केला आहे. या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. ओयोच्या जागतिक पर्यटन दिन अहवालानुसार भारतातील वारसा शहरांनंतर समुद्रकिनारा असलेल्‍या ठिकाणांना पर्यटकांकडून जास्त पसंती देण्यायत येत असल्याचे दिसून आले आहे. दिल्‍ली, हैदराबाद, बेंगळुरू, कोलकाता आणि चेन्‍नई ही भारतातील व्‍यवसायीक ठिकाणे म्हणून अग्रस्थानी आहेत. याबरोबरच गेल्या दोन वर्षांत जून 2022 हा महिना सर्वात मोठा पर्यटन महिना ठरल्याचे आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.  

गेल्या दोन अडीच वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीचे संकट आहे. त्यामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध होते. यात पर्यटनावर देखील निर्बंध होते. परंतु, गेल्या वर्षभरात कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आली आहे. त्यामुळे पर्यटकांनी देखील आपल्या आवडत्या ठिकाणी भेटी देण्यात सुरूवात केली. याचाच अभ्यासस ओयोने आपल्या अहवालात केलाय. त्यामध्ये जून 2021 पेक्षा जून 2022 मध्ये पर्यटनात मोठी वाढ झाली आहे. आयोगाने  जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 पर्यंतच्‍या बुकिंच्या तारखांनुसार संशोधन केले. या संशोधनानुसार जानेवारी-सप्टेंबर 2022 दरम्यान गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत विश्रांतीसाठी पर्यटनामध्ये 62 टक्‍के वाढ झाली. 

कोरोना महामारीनंतर संपूर्ण भारतातील देशांतर्गत पर्यटनाला महत्त्वपूर्ण चालना मिळाली आहे. जून 2022 मध्ये मागच्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मागणीत सर्वाधिक वाढ झाली. ही माहिती मागील वर्षीच्‍या याच कालावधीसाठी तुलनात्मक विश्लेषण आहे. या अहवालानुसार जयपूर आणि गोवा ही भारतातील लोकप्रिय विश्रांतीची स्‍थळे म्हणून सातत्याने आघाडीवर आहेत. तर कोची, वाराणसी आणि विशाखापट्टणम ही भारतीय पर्यटकांमध्ये अव्वल क्रमांकाची स्‍थळे म्हणून उदयास आली आहेत. पर्यटन व्यवसायानिमित्त प्रवासाचा विचार केला तर 2022 च्या पहिल्या दोन तिमाहीत दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, कोलकाता आणि चेन्नई भारतातील अव्‍वल व्यावसायिक ठिकाणे अग्रस्थानी आहेत.  

जानेवारी 2022 पासून कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी घट झाली त्यानंतर आलेल्या पहिल्याच म्हणचे  यंदाच्या  उन्हाळ्यात पर्यटन क्षेत्रात विक्रमी वाढ झाली. सध्या बुक करण्यात आलेल्या ट्रेंडच्या डेटा-बॅक्ड प्रेडिक्टिव विश्लेषणानुसार ओयोने अंदाज वर्तवला आहे की, मेट्रोपॉलिटन शहरांपैकी दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, कोलकाता आणि चेन्नईमध्ये आगामी पर्यटन महिन्यांमध्ये सर्वाधिक प्रवासाची मागणी असेल. तर विश्रांतीच्या ठिकाणांमध्ये जयपूर, गोवा, नागपूर, डेहराडून आणि वाराणसी या स्‍थळांना या सणासुदीच्या काळात प्रवासाच्या मागणीचा फायदा होणार आहे. जवळपास 25 टक्‍क्‍यांसह बहुतेक हिल स्टेशन्स ऑक्टोबर-डिसेंबर 2022 दरम्यान सर्वाधिक पसंतीची स्‍थळे असण्याचा अंदाज आहे. तर 20 टक्‍के हेरिटेज शहरे आणि जवळपास दहा टक्‍के समुद्रकिनाऱ्यांना पहिली पसंती असण्‍याचा अंदाज आहे. प्रयागराज, रायपूर, पुरी, नाशिक, बरेली यांसारखी अनेक इतर स्थळे देखील या यादीत समाविष्ट आहेत. 

ओयोचे चीफ सर्विस ऑफिसर आणि उत्‍पादनाचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष श्रीरंग गोडबोले यांनी बदलत्‍या पर्यटन स्थितीबाबत माहिती दिली आहे. "प्रवासाच्या सवयी आणि भावनांमध्ये मोठा बदल झाला आहे. अनियोजित सुट्ट्या, अगदी शेवटच्या क्षणी कमी मुक्काम, जवळपासची व इतर ठिकाणी शोधणे हे अलिकडे ट्रेंड्स बनले आहेत. ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार सुविधा देणे, ते स्‍वत:हून प्रवासाबात घेणारे निर्णय, सोयीसुविधा आणि वैयक्तिकरण हे आज ग्राहकांच्या महत्वाच्या गोष्टी आहेत, असे माहिती गोडबोले यांनी दिलीय. 

ओयोच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर संपूर्ण युरोप, नेदरलँड्स, डेन्मार्क, बेल्जियम, ऑस्ट्रिया आणि फ्रान्स ही सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्‍थळे आहेत. तसेच जर्मन लोक त्यांच्या सुट्ट्या नेदरलँड्समधील नॉर्थ हॉलंड, डेन्मार्कमधील झीलंड आणि जर्मनीमधील बाल्टिक समुद्र प्रदेश यांसारख्या ठिकाणी घालवण्यास प्राधान्य देतात. युरोपात 2022 मध्ये क्रॉस-कंट्री प्रवासातही वाढ झाली आहे. यूएसएमध्ये जवळ-जवळ 55 टक्‍के अमेरिकन पर्यटक  ग्लेशियर पार्क, तलाव, धबधबे, नैसर्गिक तलाव यांसारख्या आकर्षणांच्या स्थळांची निवड करतात. तर 14 टक्‍के पर्यटक त्यांच्या सुट्ट्या समुद्रकिनारे असलेल्‍या ठिकाणी व्‍यतित करण्‍यास प्राधान्य देतात. यावर्षी उन्‍हाळ्यामध्‍ये पर्यटकांनी लिंकन सिटी, न्यू पोर्ट आणि सीसाइड ऑर्लेंडो यांसारख्‍या ठिकाणांना अधिक प्राधान्‍य दिले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget