एक्स्प्लोर

J&K : जम्मू-काश्मीरच्या दहशतवादी संघटनांकडून गेल्या चार वर्षांत 700 तरुणांची भरती, केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती

jammu kashmir : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या वर्षी जून अखेरपर्यंत 69 तरुणांची दहशतवादी संघटनांनी भरती केली आहे.

Jammu Kashmir : दहशतवादी संघटनांनी गेल्या चार वर्षांत जम्मू आणि काश्मीरमध्ये 700 तरुणांची भरती केली आहे, तर सध्या केंद्रशासित प्रदेशात 141 सक्रिय दहशतवादी आहेत, त्यापैकी बहुतेक विदेशी आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांची भरती सुरू असून, सध्या सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी तळांमधून घुसखोरी सुरू असल्याचे सूचित करते.

82 विदेशी आणि 59 स्थानिक दहशतवादी सक्रिय
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 5 जुलै 2022 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 82 विदेशी दहशतवादी आणि 59 स्थानिक दहशतवादी सक्रिय होते. या संदर्भात माहितीचा हवाला देत एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे दहशतवादी प्रामुख्याने जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन याशिवाय लष्कर-ए-तैयबा, त्याची संलग्न संघटना द रेझिस्टन्स फ्रंट यासारख्या संघटनांतील आहेत.

जून अखेरपर्यंत 69 तरुणांची भरती
विविध दहशतवादी संघटनांनी गेल्या चार वर्षांत जम्मू काश्मीरमध्ये 700 स्थानिक तरुणांची भरती केली आहे, त्यापैकी 2018 मध्ये 187, 2019 मध्ये 121, 2020 मध्ये 181 आणि 2021 मध्ये 142 तरुणांची भरती करण्यात आली होती. या वर्षी जून अखेरपर्यंत 69 तरुणांची दहशतवादी संघटनांनी भरती केली आहे.

125 दहशतवाद्यांना केले ठार 
त्याचवेळी, सुरक्षा दलांनी या वर्षात आतापर्यंत 55 चकमकीत 125 दहशतवाद्यांना ठार केले आहे. यावर्षी दहशतवादी घटनांमध्ये आतापर्यंत दोन सुरक्षा जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 23 जण जखमी झाले आहेत. या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये 20 नागरिकांचाही बळी गेला आहे. यासोबतच या वर्षात केंद्रशासित प्रदेशात आठ ग्रेनेड हल्ले झाले आहेत. आकडेवारीनुसार, 2021 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये 146 दहशतवादी आणि 41 नागरिकांचा मृत्यू झाला आणि तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही आपला जीव गमवावा लागला. गेल्या वर्षी दहशतवादी घटनांमध्ये एकूण 63 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते.

संबंधित बातम्या

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सैन्याला मोठं यश, दोन दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण

Kashmir Terrorist : काश्मीरमध्ये गावकऱ्यांनी  दोन दहशतवाद्यांना पकडले, डीजीपींकडून दोन लाख रूपयांचे बक्षीस जाहीर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होताMihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हातीAnandache Paan : अनुवादक प्रफुल्ल शिलेदार आणि लेखक हृषिकेश पाळंदे यांच्याशी खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं विधान
Embed widget