एक्स्प्लोर
जम्मू-काश्मीर : दगडफेक करणाऱ्यांमध्ये माणसं पेरुन हल्लेखोर पकडले
या दगडफेक करणाऱ्या हल्लेखोरांमध्ये पोलिसांनी आपलेच काही लोक पेरले आहेत, ज्यामुळे हल्लेखोरांना पकडणं सोपं जात आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या या आयडियामुळे काही हल्लेखोरांना अटक करण्यात आलं आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा बलांवर होणारी दगडफेक हा गंभीर विषय आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी नवी शक्कल लढवली आहे. या दगडफेक करणाऱ्या हल्लेखोरांमध्ये पोलिसांनी आपलेच काही लोक पेरले आहेत, ज्यामुळे हल्लेखोरांना पकडणं सोपं जात आहे.
जम्मू काश्मीर पोलिसांच्या या आयडियामुळे काही हल्लेखोरांना अटक करण्यात आलं आहे. शुक्रवारी जामा मशिदीजवळ दगडफेक करणाऱ्या काही हल्लेखोरांमध्ये पोलिसांनी साध्या वेशात काही आपलेच लोक पाठवले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास न होता पोलिसांनी खऱ्याखुऱ्या हल्लेखोरांना पडकलं.
दरम्यान, याचा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. सोशल मीडियावर पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे.
शुक्रवारी जामा मशिद परिसरात नमाज पठण झाल्यानंतर जमावात पोलिसांनी काही आपले विश्वासू साथीदार पेरले. काही वेळांनंतर जामा मशिद परिसरात दगडफेकीला सुरूवात झाली. यावेळी समोर असलेल्या पोलिसांकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही. कारण, प्लॅन अगोदरच ठरलेला होता.
दगडफेक सुरु होताच गर्दीने रौद्र रूप धारण केले आणि शेकडो लोक जमा झाले. या हिंसक जमावाचं नेतृत्व दोन तरूण करत होते. जमावात साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी त्या दोन तरूणाला हेरलं.
यावेळी इतरांना इजा पोहचू नये म्हणून त्यांनी खेळण्यातील बंदुकीचा वापर करत दोन समाजकंटकांना चतुराईने अटक केली. आपला म्होरक्याला पोलिसांनी पडकल्याचं कळताच जमाव पांगला आणि दगडफेक करणारे तरुणही पळून गेले.
जम्मू काश्मीर पोलिसांकडून 2010 सालीही अशीच शक्कल लढवण्यात आली होती, ज्यामुळे खऱ्या गुन्हेगारांना पकडण्यास मदत झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement