Pahalgam Terror Attack : कुटुंबासमोरच IB अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या, भारताचं नंदनवन पर्यटकांच्या रक्ताने लाल
IB officer Shot Dead In Pahalgam Terrorist Attack : गेल्या काही दिवसांपासून गुप्तचर विभागाचा अधिकारी हा पहलगाम परिसरात कार्यरत होता. या दरम्यान तो कुटुंबासोबत फिरण्यासाठी गेला असता ही घटना घडली.

Jammu Kashmir Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यासंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये केंद्रीय गुप्तचर संघटना म्हणजे IB मध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यालाही गोळ्या घालण्यात आल्या आहेत. हा अधिकारी मूळचा हैदराबादचा असून कुटुंबासमोरच त्याची हत्या करण्यात आली आहे.
गुप्तचर संघटनेत काम करणारा हैदराबादचा हा अधिकारी कुटुंबासोबत काश्मीरमध्ये गेला होता. त्यावेळी तो एक रील शूट करत होता. त्या दरम्यान त्याला गोळ्या घालण्यात आल्या. त्याच्या कुटुंबासमोरच दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घातल्या. यावेळी त्या अधिकाऱ्याची पत्नी आणि मुले समोर होती अशी माहिती आहे.
गेल्या काही दिवसात ते काश्मीरमध्ये कार्यरत होते. या दरम्यान ते पहेलगाममध्ये कुटुंबासोबत फिरायला गेले. त्याचवेळी त्याची हत्या करण्यात आली.
Pahalgam Terror Attack : आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत 28 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. कलम 370 हटवल्यानंतर हा एक मोठा हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे.
या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकमधील जोडप्यातील पतीला त्याच्या पत्नीसमोरच गोळ्या घालण्यात आल्या.
धर्म विचारून गोळ्या झाडल्या
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या पर्यटकांवरील हल्ल्यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या आकड्यामध्ये वाढ होऊ शकते. तसेच अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसेच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे.
गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये
या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. NIA टीम बुधवारी पहलगामला जाऊ शकते. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा करून या हल्ल्याची माहिती दिली. पंतप्रधानांशी बोलल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीची बैठक बोलावली. सध्या गृहमंत्री श्रीनगरला पोहोचले आहेत.
कोणालाही सोडणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी X वर पोस्ट करून कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितले. हे कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
ही बातमी वाचा:























