एक्स्प्लोर

देशातील 'या' प्रसिद्ध मंदिराला 113 कोटी रुपयांचं दान, जगभरातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचं ठिकाण

Jagannath Puri Temple : देशातील अनेक ठिकाणच्या मंदिरांना भाविक मोठ्या प्रमाणात दान देत आहेत. दरवर्षी कोट्यावधी रुपयांचं दान मंदिरांच्या दानपेटीत जमा झाल्याचं दिसत आहे.

Jagannath Puri Temple : देशातील अनेक ठिकाणच्या मंदिरांना भाविक मोठ्या प्रमाणात दान देत आहेत. दरवर्षी कोट्यावधी रुपयांचं दान मंदिरांच्या दानपेटीत जमा झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, ओडिसातील पुरीचं जगन्नाथ मंदिर (Jagannath Puri Temple) हे देशासह जगभरात लाखो भाविकांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे. या मंदिराला दरवर्षी भाविका मोठ्या प्रमाणात दान देतात. ओडिसा सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3 वर्षात मदिराला 113.02 कोटी रुपयांचं दान भाविकांनी दिलं आहे.  

पुरीचं जगन्नाथ मंदिर हे देशातील सर्वात जास्त भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे. गेल्या 3 वर्षात मोठ्या प्रमाणात भाविकांनी या मंदिराला भेटी दिल्या आहेत. पुरी येथील जगन्नाथ मंदिराला गेल्या तीन आर्थिक वर्षांत 113.02 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. ओडिशा सरकारचे  मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी विधानसभेत देणगीच्या संदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये मंदिरातील दानपेटी, बँक खाती आणि इतर स्त्रोतांकडून धार्मिक देणग्या मिळाल्या आहेत.

जगन्नाथ मंदिराला 2022-23 या वर्षात मिळाली होती सर्वाधिक देणगी 

जगन्नाथ मंदिराला देण्यात येणाऱ्या देणगीबाबत नुकतेच ओडिशा विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावर राज्य सरकारच्या वतीने उत्तरे देण्यात आले आहे. पुरीचे जगन्नाथ मंदिर हे चार धामांपैकी एक आहे. येथे भगवान श्रीकृष्ण तसेच त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचे मंदिर आहे. मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 ते 22 ते 2023 ते 24 या काळात मंदिराला दानपेटीत 40.61 कोटी रुपये, बँक खात्यात 59.79 कोटी रुपये तर  इतरमध्ये 12.60 कोटी रुपये देण्यात आले आहेत. जगन्नाथ मंदिराला 2022-23 मध्ये सर्वाधिक 50.80 कोटी रुपये, तर 2023-24 मध्ये 44.90 कोटी रुपये आणि 2021-22 मध्ये 17.31 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. या वर्षी पुरीच्या जगन्नाथ मंदिराचा रत्न भंडार चर्चेत होते. कारण तब्बल 46 वर्षांनंतर ते उघडण्यात आले होते. याआधी मंदिराचे चारही दरवाजे उघडण्यात आले आणि धार्मिक विधीनंतर एका शुभ मुहूर्तावर मंदिरातील रत्न भांडार तब्बल 46 वर्षांनंतर उघडण्यात आले.

दरवर्षी लाखो भाविक भक्त अनेक ठिकाणच्या धार्मिक स्थळांना भेट देत असतात. यावेळी भाविक दानपेटीत मोठ्या प्रमाणात दान देखील देत असतान. कोण पैशांच्या स्वरुपात दान देते तर कोण सोनं चांदी तर कोणी वस्तुंच्या स्वरुपात दान देत असतात.

महत्वाच्या बातम्या:

Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिराच्या दानपेट्यातील पैशांची मोजणी सुरू असतानाच चोरटा 'मालामाल', हनुमान मंदिरात दर्शन घेतलं, दानपेटीवर पिशवी टाकली अन्...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 08 December 2024ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 December 2024Aaditya Thackeray On Rais Shaikh : समाजवादी पक्ष भाजपची बी टीम, आदित्य ठाकरेंचा आरोपJob Majha : सीमा रस्ते संघटनमध्ये कामाची संधी, अटी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
Embed widget