Srinagar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Srinagar Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu- Kashmir) सुरक्षा दलांना मोठं यश आलंय. श्रीनगरमध्ये (Srinagar) दोन वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आलीय.
![Srinagar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, दोन दहशतवाद्यांचा खात्मा J&K Police: Top LeT terrorist Salim Parray killed in Srinagar encounter Srinagar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, दोन दहशतवाद्यांचा खात्मा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/4678c55cea1011fd70b3c407fd5b3c08_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Srinagar Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu- Kashmir) सुरक्षा दलांना मोठं यश आलंय. श्रीनगरमध्ये (Srinagar) दोन वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आलीय. श्रीनगरच्या बाहेरील हरवनमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. या भागात पंधरा दिवसामधील ही दुसरी चकमक आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय. त्याचं नाव सलीम परे (Salim Parray) असून तो लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होता, अशी माहिती काश्मीरचं पोलीस महानिरीक्षक विजय कुमार (IGP Kashmir Vijay Kumar) यांनी ट्विट करून दिलीय.
या ट्विटमध्ये आणखी एका परदेशी दहशतवाद्याचाही खात्मा करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. मात्र, त्यानंतर केवळ सलीमचा खात्मा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पाकिस्तानी दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाला असला तरी त्याला पकडण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. हरवाननंतर श्रीनगरच्या गौसामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकानं एका दहशतवाद्याचा खात्मा केलाय. घटनास्थळावरून दारूगोळा जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या परिसरातही सुरक्षा दलाकडून शोध मोहिम सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात भारतीय सुरक्षा दलांनी ऑपरेशन सुरू केलंय. दरम्यान, दक्षिण काश्मीरमध्ये 30 डिसेंबर रोजी झालेल्या दोन चकमकीत दोन पाकिस्तानी नागरिकांसह सहा दहशतवादी मारले गेले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 31 डिसेंबरला श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांनी 31 डिसेंबरला जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली होती.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)