लालू यादव यांच्या मुलांची संपत्ती जप्त, आयकर विभागाची कारवाई

पाटणा : आयकर विभागाने राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यांच्या मुलांची बेहिशेबी संपत्ती जप्त केली आहे. लालू यादव यांच्या मुलांशी संबंधित सर्व बेहिशेबी संपत्ती जप्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसंच राज्यसभेची खासदार आणि लालूप्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती यांना समन्स बजावून, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयकर विभागाच्या कार्यालयात हजर होऊन बेहिशेबी व्यवहारासंदर्भात स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. याआधी आयकर विभागाने लालूंच्या मुलांची 50 कोटींची संपत्ती जप्त केली होती. तसंच दोन दिवसांपूर्वीच लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रसाद यादव याला देण्यात आलेला पेट्रोलपंपाचा परवानाही रद्द करण्यात आला होता. बेहिशेबी कलमांतर्गत 90 दिवसांच्या आत विभागाला स्पष्टकरण देणं आवश्यक आहे. जर संबंधित व्यक्तीने दिलेल्या मुदतीत स्पष्टीकरण दिलं नाही, तर जप्तीची कारवाई केली जाते.
लालू प्रसाद यादव यांच्या 22 ठिकाणांवर आयकर विभागाचा छापा
मीसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार यांना आयकर विभागाने दोन वेळा समन्स बजावला होता, पण ते हजर झाले नाहीत. मीडिया आणि सुरक्षेच्या कारणांमुळे उपस्थित राहता आलं नाही, असं कारण त्यांनी सांगितलं. याआधीही 6 जून रोजी हजर न झाल्याने आयकर विभागाने मीसा भारतींना 10 हजारांचा दंडही ठोठावला होता. मागील महिन्यात 23 मे रोजी आयकर विभागाने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी लालू यादव आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संबंधित 22 ठिकाणांवर छापा टाकला होता. मात्र लालू यांनी छाप्याचा वृत्ताचा इन्कार केला होता.Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती





















