ISRO : चंद्र आणि मंगळानंतर इस्रोची नजर आता शुक्रावर! चांद्रयान-3 नंतर पाठवणार यान, जपानची घेणार मदत
ISRO Upcoming Missions : चांद्रयान-3 नंतर, इस्रोचे पुढील मिशन शुक्रावर यान पाठवणे आहे. यामध्ये जपानचीही मदत घेतली जाणार आहे.
ISRO Upcoming Missions : चंद्र (Moon) आणि मंगळ मोहिमेनंतर (Mars Mission) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) इस्रो आता शुक्राचा अभ्यास करण्याची योजना आखत आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी चांद्रयान-3 अंतराळात पाठवले जाईल. हे यान चंद्रावरील गडद सावलीचा अभ्यास करेल. यासाठी इस्रो जपानी एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) ची मदत घेणार आहे. तर, चांद्रयान-3 नंतर, इस्रोचे पुढील मिशन शुक्रावर यान पाठवणे आहे. यामध्ये जपानचीही मदत घेतली जाणार आहे.
भारताची अंतराळ विज्ञानात वेगाने प्रगती
उत्तरांचल विद्यापीठात आयोजित आकाश तत्व संमेलनामध्ये, नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर स्पेस अँड अलाईड सायन्सचे (PRL) डॉ. अनिल भारद्वाज, यांनी सांगितले की, भारत अवकाशातील हालचालींवर लक्ष ठेवून आहे. 1975 मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह प्रक्षेपित केल्यानंतर, भारताने अंतराळ विज्ञानात वेगाने प्रगती केली आहे. आज भारत देश यात आघाडीच्या भूमिकेत आहे. भविष्यात शुक्र आणि सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपण स्वतःचे तंत्र विकसित करणार आहोत. त्यांनी सांगितले की, स्पेस एजन्सीने मंगळाचा पुन्हा एकदा अभ्यास करण्याची योजना आखली आहे. चांद्रयान-3 मिशन अंतर्गत इस्रोने तयार केलेले लँडर आणि रोव्हर चंद्राच्या गडद भागातील कक्षेत ठेवले जातील, यात जपानी अंतराळ संस्थेच्या मदत घेतली जाईल. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिंग करेल. त्यानंतर रोव्हर चंद्राच्या सर्वात गडद भागात जाईल, जिथे सूर्यप्रकाश कधीही पोहोचत नाही.
शुक्र ग्रहावरही असेल लक्ष
भारद्वाज म्हणाले की, आदित्य एल-1 आणि चांद्रयान-3 या मोहिमा पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्राधान्याने हाती घेतल्या जातील. JAXA सोबत शुक्र ग्रह आणि चंद्रावर मोहिमेची शक्यता आहे. चांद्रयान-3 चे यश लक्षणीय होते, तसेच ते पुन्हा JAXA सोबत मिशनमध्ये वापरले जाणार आहे.
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मिशन आदित्य एल-1
डॉ. अनिल भारद्वाज यांनी सांगितले की, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 मिशन सुरू करण्यात आले आहे. हे एक अनोखे मिशन असेल. पेलोड वाहून नेणारा 400 किलोचा उपग्रह सूर्याभोवती एका कक्षेत अशा प्रकारे ठेवला जाईल की, तो एका निर्धारित बिंदूपासून ताऱ्यांचे सतत निरीक्षण करू शकेल. आदित्य एल-1 ची कक्षा पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किमी दूर असेल. हे कोरोनल हीटिंग, सोलर विंड आणि कोरोनल मास इजेक्शन याविषयी माहिती गोळा करेल.
इतर महत्वाच्या बातम्या
Bharat Jodo Yatra : मशाल हाती घेऊन आज राहुल गांधींची महाराष्ट्रात एन्ट्री, 14 दिवस राज्यात 'भारत जोडो'