एक्स्प्लोर
एकाचवेळी 104 उपग्रह अवकाशात, 'इस्रो'कडून रशियाचा विक्रम मोडित
![एकाचवेळी 104 उपग्रह अवकाशात, 'इस्रो'कडून रशियाचा विक्रम मोडित Isro To Set Record By Launching 104 Satellites In One Go एकाचवेळी 104 उपग्रह अवकाशात, 'इस्रो'कडून रशियाचा विक्रम मोडित](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/15022300/ISRO-PSLV-C-37.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने एकाचवेळी 104 उपग्रहांचं प्रक्षेपण केलं आहे. एकाच यानातून 104 उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या सोडून भारताने रशियाचा विक्रम मोडित काढला आहे.
PSLV या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा केंद्रावरून PSLV- C37 सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी उपग्रहांचं अवकाशात प्रक्षेपण झालं.
https://twitter.com/isro/status/831715644286574592
एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात सोडणारा भारत हा पहिलाच देश आहे. यापूर्वी 37 उपग्रह एकाच रॉकेटमधून अवकाशात सोडण्याचा विक्रम रशियाच्या नावे होता. इस्रोने जून 2015 मध्ये एकाच वेळी 23 उपग्रह लाँच केले आहेत.
714 किलो वजनाचा कार्टोसॅट 2 उपग्रह पृथ्वीच्या निरीक्षणासाठी आधी लाँच करण्यात आला, त्यानंतर एकूण 664 किलो वजनाचे 103 उपग्रह अवकाशात झेपावले. 103 उपग्रहांमध्ये भारताच्या दोन नॅनो उपग्रहांसह 96 अमेरिकेचे तर इस्रायल, कझाखिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लँड आणि यूएईचा प्रत्येकी एक उपग्रह आहे.
अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या चंद्रयान आणि मॉम (मार्स ऑरबिट मिशन)ला वापरलेल्या बनावटीची शक्तिशाली रॉकेट यावेळीही वापरली आहेत. इस्रोच्या या यशामुळे आता अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये एका नव्या दरयुद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
शेत-शिवार
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)