एक्स्प्लोर

NEET UG Paper Leak :  नीट यूजी परीक्षेचा पेपर लीक होताच लातूरमध्ये साफसफाई सुरु, उद्योग भवनातील क्लासेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश  

NEET UG Paper Leak : नीट यूजी पेपरफुटी प्रकरणानंतर लातूरच्या उद्योगभवनमधील क्लासेस आणि होस्टेल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लातूर : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटल्यानं देशभरात खळबळ उडाली आहे. सीबीआयनं या प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक केलेली आहे. यापैकी बहुतांश आरोपी महाराष्ट्रातील आहेत. सीबीआयनं आज नीट परीक्षेतील भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केल्याप्रकरणी पुण्यातील मनीषा हवालदार या महिलेला अटक करण्यात आली आहे. हेच टायमिंग साधथ  नीट पेपर फुटी प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या लातूरच्या तथाकथित ‘ट्युशन एरिया’वर आता प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. लातूर जिल्हा उद्योग केंद्राने लातूर इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील उत्पादनासाठी मंजूर गाळ्यांमध्ये सुरू असलेले सर्व व्यावसायिक उपक्रम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

लातूर उद्योग धवन परिसरात साफ सफाई

लातूर  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा उद्योग भवन परिसरातील अनेक गाळ्यांमध्ये खाजगी कोचिंग क्लासेस, हॉस्टेल्स, खानावळी, हॉटेल, अभ्यासिका, बुक सेंटर आणि इतर व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.

मुळात हा परिसर उद्योग आणि उत्पादन व्यवसायासाठी उद्योजकांना लीजवर देण्यात आला होता. मात्र 2000 नंतर येथील अनेक उद्योग बंद पडले आणि जागा मोठ्या प्रमाणात खाजगी ट्युशन व्यवसायासाठी भाड्याने दिली गेली. त्यामुळे “ज्या उद्देशासाठी जागा देण्यात आली, तो उद्देशच हरवला” अशी भूमिका घेत माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी गेल्या दहा वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे निर्णय प्रलंबित असल्याचे बोलले जात होते.

नीट पेपर फुटी प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासन सक्रिय झाले असून, लातूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेला पत्र पाठवून संबंधित सर्व खाजगी व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

NEET पेपर फुटी प्रकरणात CBI ने आतापर्यंत 11 लोकांना केली आहे अटक

महाराष्ट्रातून अटक :

मनिषा हवालदार - CBI 

शिवराज मोटेगावकर - CBI कोठडी

प्रल्हाद कुलकर्णी - CBI कोठडी

मनिषा मांढरे - CBI कोठडी

मनिषा वाघमारे - CBI कोठडी

शुभम खैरनार - CBI कोठडी

धनंजय लोखंडे - न्यायालयीन कोठडी

दुसऱ्या राज्यातून झालेली अटक :

दिनेश बिवाल - न्यायालयीन कोठडी

मांगीलाल बिवाल - न्यायालयीन कोठडी

विकास बिवाल - न्यायालयीन कोठडी

यश यादव - न्यायालयीन कोठडी

दरम्यान, नीट यूजी परीक्षा आता 21 जून रोजी घेण्यात येणार आहे. 3 मे रोजी घेण्यात आलेली नीट यूजी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Embed widget