एक्स्प्लोर

Abhijeet Dipake : मोठी बातमी, अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक, कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं

Abhijeet Dipake : कॉकरोच जनता पार्टी या डिजीटल प्लॅटफॉर्मचे संस्थापक अभिजीत दीपके यांचं इन्स्टाग्राम खातं हॅक करण्यात आलं आहे.

Abhijeet Dipake : नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि देशभरात अभिजीत दीपके चर्चेत आहेत. अभिजीत दीपके यांनी स्थापन केलेल्या कॉकरोच जनता पार्टीची देशभर चर्चा सुरु आहे. अभिजीत दीपके हे मूळचे महाराष्ट्रातील असून सध्या शिक्षणानिमित्त अमेरिकेतील बोस्टन येथे आहेत. अभिजीत दीपके यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन त्यांचं इन्स्टाग्राम खातं हॅक झाल्याची माहिती दिली आहे. याशिवाय बॅकअप म्हणून कॉकरोच जनता पार्टीचं काढलेलं खातं हटवण्यात आल्याची माहिती देखील दीपके यांनी शेअर केली आहे.

अभिजीत दीपके यांचं इन्स्टाग्राम हॅक

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान देशातील युवकांचा परजिवी आणि झुरळं असा उल्लेख केला होता. दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं. मात्र, अभिजीत दीपके यांनी इन्स्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टी नावाचं अकाऊंट सुरु केलं. दीपके यांच्या या पार्टीच्या फॉलोअर्सच्या संख्येत नाट्यमयरित्या वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. इन्स्टाग्रामवर सीजेपीचे 2 कोटींहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. मात्र, अभिजीत दीपके यांनी त्यांच्या पक्षाची सोशल मीडिया खाती हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला होता. दीपके यांचा दावा खरा ठरला असून त्यांचेच इन्स्टाग्राम खाते हॅक करण्यात आले आहे. याशिवाय बॅक अप म्हणून काढलेलं कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टाग्राम खातं देखील हटवण्यात आलं आहे. 

अभिजीत दीपके यांना धमकी 

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी त्यांच्या एक्स प्लटॅफॉर्मवर त्यांना आलेल्या धमक्यासंदर्भातील व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केल्या आहेत. कॉकरोच जनता पार्टीचं एक्स खातं देखील काल हटवण्यात आलं होतं. कायदेशीर विनंतीवरुन एक्स खातं भारतात ब्लॉक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. अभिजीत दीपके यांनी त्यानंतर कॉकरोच इज बॅक या नावानं नवं खातं सुरु केलं आहे. नव्या खात्याच्या फॉलोअर्सची संख्या 1  लाख 87  हजारांवर पोहोचली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या जुन्या एक्स खात्यावरील फॉलोअर्सची संख्या 2 लाख 1 हजार इतकी होती. 

अभिजीत दीपके यांनी त्यांच्या एक्स खात्यावरुन त्यांना आलेल्या धमक्यांची माहिती दिली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अभिजीत दीपके यांनी सुरु केलेल्या प्लॅटफॉर्मला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय कॉकरोच जनता पार्टीचे 94 टक्के फॉलोअर्स भारतीय असून त्यांना पाकिस्तानी ठरवण्याची घाई का करताय असा सवाल देखील त्यांनी केला आहे.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget