Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
ग्रामीण महाराष्ट्रातल्या पेट्रोलपंपावर सध्या वाहनांपेक्षा कॅन किंवा गॅलनचीच गर्दी जास्त दिसतेय... मान्सून तोंडावर आहे... पण डिझेल मिळत नसल्यानं ट्रॅक्टर जागेवर उभा आहे आणि त्यामुळे शेतीची कामं खोळंबली आहेत... सरकार म्हणतंय घाबरून जाण्याचं कारण नाही... मग शेतकऱ्यांना पेट्रोलपंपावर रात्र का काढावी लागतेय? सरकार म्हणतंय दिसतेय तेवढी भीषण परिस्थिती नाही... मग नेमकं वास्तव तरी काय आहे? महाराष्ट्राला संभ्रम नकोय, तर खरी परिस्थिती जाणून घ्यायची आहे... कारण प्रश्न तुमच्या आमचं पोट भरणाऱ्या शेतकऱ्याचा आहे...
बुलढाण्याच्या चिखलीमधली ही दृश्यं
मोजदाद करायची झाली, तर आकडा दीडशे ते दोनशेच्या घरात नक्कीच पोहोचेल
खरं या ट्रॅक्टर्सची जागा शेतात असायला हवी
मात्र डिझेलच्या तुटवड्यामुळे त्यांना पेट्रोलपंपाबाहेर रांगेत तिष्ठत उभं राहावं लागतंय
परभणीतल्या अनेक पेट्रोलपंपाबाहेर जवळपास हेच दृश्यं नजरेस पडतंय
सूर्य उगवतो आणि मावळतो
मात्र पेट्रोलपंपावरच्या कॅनची रांग कायम आहे.
All Shows
































