एक्स्प्लोर

नकाराला स्वीकारणं....एक आव्हान

आयुष्यात सर्वात आव्हानात्मक गोष्टींची यादी आपण केली तर त्यात पहिल्या पाचांमध्ये येणारा घटक म्हणजे नकाराला स्वीकारणं. अर्थात हे माझं मत आहे. नकार... म्हणायला फक्त तीन अक्षरी शब्द आहे....पण, त्या नकार स्वीकारण्याने किंवा न स्वीकारण्याने आयुष्य बदलून गेल्याच्या अनेक घटना आपण आजूबाजूला पाहतो. वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत सगळीकडेच या नकाराचा रोल फार मह्त्त्वाचा असतो. यामध्ये मला जास्त फोकस सध्या करायचाय तो लहान वयावर. अर्थात संस्कारक्षम वयावर. पाच ते पंधरा या वयोगटातल्या मुलांचं मन हे मातीच्या गोळ्यासारखं असतं. त्याला आकार द्याल तसं ते घडतं. त्याच वयात म्हणजे पाच वर्षांपासून थोडंसं कळू लागल्याने मागण्या खरं तर हट्ट वाढलेले असतात. हेच हवं, असंच हवं, इतकंच हवं. एक ना अनेक. याच वेळी आईवडील मुलाला हवं तेव्हा हवं ते देत गेले तर, त्याचा आनंद तुम्हाला तात्पुरता सुखावेल. पण, दीर्घकालीन विचार केल्यास ही धोक्याची पहिली पायरी आहे. जिथे तुम्ही मुलांच्या मागण्यांना ब्रेक लावायला हवा. अशा डिमांड्सचं रुपांतर पुढे हव्यासात झालं तर नुकसान होतं.

एखादी महागडी वस्तू, ड्रेस, महागड्या हॉटेलचं जेवण अगदी काहीही या लिस्टमध्ये असू शकतं. केवळ मुलांच्या चेहऱ्यावरच्या आनंदापोटी तो म्हणेल तसं प्रत्येक वेळी आपण करत गेलो तर पुढे थोडं मोठं झाल्यावर हीच महत्त्वाकांक्षा हव्यासामध्ये बदलली जाते आणि वाटचाल खडतर होते. सगळंच बिनसत जातं. सध्याच्या धावपळीच्या आणि कॉर्पोरेट कल्चरच्या युगात आईवडील मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. याचंही गिल्ट काही वेळा त्यांच्या मनात असतं. म्हणूनही मुलांचे लाड अनेकदा पुरवले जातात. त्यात सध्या छोट्या कुटुंबात म्हणजे बऱ्याच ठिकाणी एकच मूल (हम दो हमारा एक) कुटुंबात असतं. याहीवेळी ही डिमांडिंग सवय वाढत जाते. एकाच मुलावर आईवडिलांचं लक्ष केंद्रित असतं. साहजिकच लाड, प्रेम, कौतुक सर्व काही त्याचंच होत असतं. ही आईवडिलांसाठी फार ट्रिकी सिच्युएशन आहे. 'मागाल ते पुरवू'चा फार चुकीचा संदेश या मुलांमध्ये जातो. पुढे मुलं फार आक्रस्ताळी, मनमानी करणारी होऊ शकतात. जे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठीही घातक आहे. म्हणून अगदी याच म्हणजे पाच ते पंधरा वयातच आईवडिलांनी मुलांना ग्रेसफुली नकार द्यायला हवा आणि तो तितक्याच खिलाडूवृत्तीने पचवायलाही शिकवायला हवा. 

काळानुरूप खूप गोष्टींची उपलब्धता असणं हाही फॅक्टर यामध्ये महत्त्वाचा आहे. म्हणजे आमची पिढी जेव्हा पाच वर्षांची होती म्हणजे ८० च्या दशकात...तो काळ आणि आताची पिढी जेव्हा पाच वर्षाच्या वयोगटात आहे म्हणजे २०२६ चा काळ. आजूबाजूला जग प्रचंड बदललंय. आपला जगण्याचा वेग वाढलाय, आर्थिकदृष्ट्याही परिस्थिती बदलल्याने पर्चेसिंग पॉवर अर्थात वस्तू किंवा सेवा विकत घेण्याची क्षमता वाढलीय. यामुळे मनोरंजनाचे, एन्जॉयमेंटचे पर्याय रुंदावलेत. वाढलेत, त्यात फाईव्ह जीच्या वेगाने सुटणाऱ्या मनाच्या घोड्याला लगाम घालणं कठीण आहे. म्हणूनच आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडत असलं तरी त्या गोष्टीची मुलांना त्या वेळी खरंच गरज आहे का हा विचार ठराविक वयानंतर तरी व्हायलाच हवा. नाहीतर आपल्या प्रत्येक मागणीला आईवडील होकारार्थी घेऊन ती मान्य करतायत, हा अत्यंत चुकीचा मेसेज मुलांमध्ये जातो. अमृता सुभाष एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर एका एपिसोडमध्ये फार खोलवर विचार करायला लावणारं वाक्य बोलली होती... ती म्हणाली होती, आपण सकारात्मक होण्यासोबतच स्वीकारात्मक व्हायला हवं. या एका वाक्यातच सारं आलं. या स्वीकारात्मक शब्दात अनेक स्वीकार आहेत तसाच नकाराचाही स्वीकार अपेक्षित आहे. हे लिहिणं म्हणजे कुणाला काही शिकवण्याचा हेतू नाही, किंवा कुणाला टोकण्याचाही हेतू नाही. आयुष्याच्या या बाजूकडेही अतिशय डोळसपणे आणि तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न इतकाच याचा हेतू आहे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
Raigad Crime News: 'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
Embed widget