एक्स्प्लोर

CET : राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचा खुलासा

MHT CET : महाराष्ट्रात अभियांत्रिकीचे प्रवेश वेळेतच पूर्ण होणार असल्याची माहिती राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे.

मुंबई: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून 3 मे रोजी आयोजित करण्यात आलेली नीट यूजी पेपरफुटीमुळं रद्द करण्यात आली. आता नव्यानं नीट यूजी परीक्षा 21 जून रोजी घेण्यात येणार आहे. नीट परीक्षा लांबणीवर पडल्यानं महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशांवर परिणाम होईल अशा चर्चा सुरु झाली होती. मात्र, राज्य सामाईक परीक्षा कक्षानं अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार असून विद्यार्थी आणि पालकांनी संभ्रम बाळगू नये असं आवाहन केलं आहे.  

अभियांत्रिकी प्रवेश वेळेवरच  

राज्य सामाईक परीक्षा कक्षानं अभियांत्रिकीचे प्रवेश वेळेत होणार असल्याची माहिती दिली आहे.  NEET 2026 पुनर्परीक्षेमुळे राज्यातील अभियांत्रिकी व औषधनिर्माण अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होणार असल्याचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर CET कक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नीट परीक्षा रद्द झाल्याचा फटका अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र  अभ्यासक्रमांना बसण्याच्या वक्तव्यानं गोंधळ निर्माण झालेला होता. आता मात्र राज्य सामाईक परीक्षा कक्षानं स्पष्टीकरण दिलं आहे. 

महाराष्ट्रात नीट परीक्षेचे गुण केवळ 9 विशिष्ट अभ्यासक्रमांनासाठी ग्राह्य मानले जातात. हे 9 अभ्यासक्रम राज्यातील 17 शासनमान्य संस्थांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती देखील समोर आली आहे. 
 
अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी महाराष्ट्रात एमएचटी-सीईटी आणि नीट परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. यापैकी 85 टक्के जागांवरील प्रवेश महाराष्ट्रातील सीईटीच्या आधारे पार पडतात. तर, नीट यूजी परीक्षेतील गुण 15 टक्के जागा भरण्यासाठी ग्राह्य धरतात. अखिल भारतीय कोट्यासाठी नीट परीक्षेतील गुणांचा वापर केला जातो. या स्थितीमुळं महाराष्ट्रातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया वेळेत पार पडण्याची शक्यता आहे. 

नीट यूजी परीक्षा लांबणीवर गेलेली आहे. तर, दुसरीकडे एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. एमएचटी सीईटीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. तर, नीट यूजी परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार हे 21 जूनला परीक्षा झाल्यानंतर स्पष्ट होईल.  

नीट यूजी परीक्षेचे गुण आवश्यक असलेले 9 अभ्यासक्रम वगळता उर्वरित अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. AICTE च्या नियोजित वेळापत्रकानुसारच प्रवेश प्रक्रिया होणार आहे, अशी माहिती राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे. 

कोणते आहेत ‘ते’ 9 अभ्यासक्रम :

कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, फूड इंजिनिअरिंग, लेदर इंजिनिअरिंग, पॅकेजिंग टेक्नोलॉजी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, फॅशन टेक्नोलॉजी, प्रिंटिंग इंजिनिअरिंग, टेक्सटाइल केमिस्ट्री 

दरम्यान, नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार असून त्यानंतर अखिल भारतीय कोट्यातील प्रवेशासंदर्भातील स्पष्टता येईल.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
Embed widget