(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aditya L-1 Mission: मुहूर्त ठरला! इस्रोचं मिशन आदित्य 2 सप्टेंबर रोजी लाँच होणार
ISRO Aditya L1 Mission: चंद्राची मोहिम फत्ते केल्यानंतर इस्रोने आता सूर्याची मोहिम हाती घेतली आहे. त्याची तयारी देखील इस्रोकडून करण्यात आली आहे.
श्रीहरिकोटा : इस्रोचं (ISRO) मिशन आदित्य L1 (Mission Aditya) हे 2 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. श्रीहरिकोटा (Shriharikotta) येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल 1 हे मिशन लाँच करण्यात येणार आहे. इस्रोने चांद्रयान मोहीम यशस्वी करुन इतिहास रचला आहे. त्यानंतर आता सूर्यावर जाण्याची तयारी इस्रोकडून करण्यात येत आहे.
इस्रोचं आदित्य एल1 मोहिम ही सर्वात कठिण मोहिमांपैकी एक आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी म्हटलं आहे की, 'भारताची आता सूर्यावर जाण्याची तयारी सुरु आहे.' त्यांनी म्हटलं आहे की, 'भारताचं मिशन आदित्य एल1 हे सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चांद्रयानावर इस्रोचं लक्ष होतं. पण त्याच सोबत इतर काही मोहिमांची तयारी देखील इस्रोकडून करण्यात येत होती.'
Solar mission ‘Aditya’ will be ready for launch in September: ISRO chief Somanath sets next goal
— ANI Digital (@ani_digital) August 24, 2023
Read @ANI Story | https://t.co/YsvHFpatSY#ISRO #Somanath #Solarmission #AdityaMission #Chandrayaan3 pic.twitter.com/0TMYraNpZe
काय आहे मिशन आदित्य एल 1 ?
मिशन आदित्यविषयी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी माहिती दिली आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, "ही भारताची पहिलीच सूर्याची मोहीम आहे. या मोहिमेद्वारे भारत सूर्याचा अभ्यास करणार आहे. हे यान सप्टेंबरच्या सुरुवातील लाँच करण्यात येणार आहे. या मोहिमेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे."
भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी पाऊल ठेवल्यानंतर ही मोहीम हाती घेतली आहे. तसेच, भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. आदित्य L-1 अवकाशातील हवामानाची गतिशीलता, कणांचा प्रसार आणि प्रदेश इत्यादी समस्या समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती प्रदान करेल, असा इस्रोच्या शास्त्रज्ञांना विश्वास आहे. पेलोडचा सूट कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअरची हालचाल, त्यांची वैशिष्ट्ये समजून घेणे सोपे होणार आहे.
चांद्रयानाच्या महत्त्वकांक्षी मोहिमेनंतर अनेक मोहिमा इस्रोने हाती घेतल्या आहेत. यामधील मिशन आदित्य ही एक आहे. त्यामुळे इस्रोची ही मोहीम देखील चांद्रयानाप्रमाणे यशस्वी होणार असल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :