(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ISRO Chandrayaan-3 : Chandrayaan-3 शेवटची 17 मिनिटं रोव्हर स्वत: घेणार सगळे निर्णय; लॅंडींगच्या वेळी कोणती असतील आव्हानं?
चांद्रयान मोहिमेसाठी शेवटचे 17 मिनिटे महत्त्वाची असल्याचं नासा स्पेस इज्युकेटर लीना बोकील यांनी सांगितलं आहे.
ISRO Chandrayaan-3 : भारताची चांद्रयान-3 ही मोहीम आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. ISRO ISRO Chandrayaan-3 चं हे यान काही तासात चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात उतरेल. याआधी चंद्रयान-1 मोहिमेतला (Lunar Mission) इम्पॅक्ट प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशातच धडकला होता. चंद्रयान 2 मोहिमेदरम्यान विक्रम लँडरनं (Vikram Landder) या प्रदेशात उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी केला. इस्रोचं चांद्रयान-3 दक्षिण ध्रुवाजवळ वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे. या चांद्रयान मोहिमेसाठी शेवटचे 17 मिनिटे महत्त्वाची असल्याचं नासा स्पेस इज्युकेटर (NASA space Educator) लीना बोकील (Leena Bokil) यांनी सांगितलं आहे.
17 मिनिटे स्वतः निर्णय घेणार...
चांद्रयान-3 शेवटची 17 मिनिटे स्वतः निर्णय घेणार असल्याने ही 17 मिनिटे महत्त्वाची ठरणार आहेत. कुठे लँडिंग करायचे याचा निर्णय रोव्हर घेणार आहे. पुढील 14 दिवस तिथे उजेड असल्यानं तिथं काम चालणार आहे. मातीचा अभ्यास केला जाईल. वायुंचा अभ्यास केला जाईल आणि भौगोलिक स्थितीचा अभ्यास केला जाणार आहे. ही मोहीम यशस्वी झाली तर या भारत हा दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारे पहिले देश ठरणार आहे.
वेग आणि किलोमीटर यांचा समतोल राखणं गरजेचं...
चंद्राच्या दक्षिण दृवावर तापमानत मोठी तफावत असते. चंद्राच्या दक्षिण धृवावर चांद्रयानानं लॅंडिंग करणं हे सगळ्यात कठिण आहे. तापमानात तफावर असल्याने इलेट्रॉनिक डिव्हायसेसला टिकणं कठिण आहे. 25 किलोमीटवर असतानाच तो प्री लॅंडिंगासाठी तयार होणार आहे. जेव्हा हे चांद्रयान लॅंड होईल त्यावेळी त्याचा वेग आणि किलोमीटर यांचा समतोल राखणं गरजेचं असणार आहे आणि हेच सगळ्यात मोठं आव्हान असणार असल्याचं बोकील यांनी सांगितलं आहे.
लॅंडरची रचना करताना किती प्रमाणात कंपण आणि धक्का सहन करुन शकतो, याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे या लॅंडरला मोहिमेवेळी कितीही हादरे बसले तरीदेखील चंद्रावर योग्यरित्या लॅंड करेल असा दावा करण्यात आला आहे. पृथ्वीपेक्षा कमी गुरुत्वाकर्षण शक्ती चंद्रावर आहे. त्यामुळे लॅंड करणं मोठं आव्हान असणार आहे. चंद्राच्या दक्षिण धृवावर अंधार असणार आहे. या भागात पुरेसा सुर्यप्रकाश पोहचत नसल्याने ही मोहिम कठिण असणार असल्याचं त्या म्हणाल्या.
इतर महत्वाची बातमी-