ISI Espionage in India : प्रदीप कुरुलकर, पंकज शर्मा, अच्युतानंद मिश्रा, ध्रुव सक्सेना, माधुरी गुप्ता अन् आता ज्योती मल्होत्रा; देशातील उच्चशिक्षित घरभेदी गद्दारांचा 'कलंक' संपता संपेना
ISI espionage in India : ज्योतीच्या अटकेनं उच्चशिक्षित गद्दारांनी देशांशी केलेली गद्दारी (ISI espionage in India) पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. यादी मात्र वाढतच जात असल्याने चिंता वाढली आहे.

ISI Espionage in India : पहलगाममध्ये झालेल्या निष्पापांच्या रक्तपातानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्र सरकारने दहशतवादांना आणि दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा हद्दीत न घुसता थेट हवेतून दणका देत दहशतवाद्यांचे तळ आणि पाकिस्तानी एअरबेस सुद्धा उद्ध्वस्त करून टाकले. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानला दहशतवादाविरोधात कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही, असाच संदेश कृतीतून दिला. देशातील जनतेनं आणि विरोधी पक्षांच्या वज्रमुठीने सुद्धा कारवाईला शंभर हत्तीचे बळ दिले. जेव्हा देश एकसंध असतो तेव्हा शत्रूविरोधात केली जाणारी कारवाई धडकी भरवणारीच असते. अण्वस्त्रांची भाषा करणारा उर्मट पाकिस्तान अवघ्या काही दिवसांत गुडघ्यावर आला हे त्याचेच द्योतक होते.
उच्चशिक्षित गद्दारांनी देशांशी केलेली गद्दारी चिंतेचा विषय
मात्र, ही कारवाई होत असताना 'गद्दारीचा सिंदूर' सुद्धा पुन्हा एकदा समोर आला आहे. देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानी यंत्रणेला देत हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणा पोलिसांनी हिसारमधील युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या (jyoti malhotra youtuber) मुसक्या आवळल्या आहेत. ज्योतीच्या अटकेनं उच्चशिक्षित गद्दारांनी देशांशी केलेली गद्दारी (ISI espionage in India) पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. देशातील पोलिसांसह राज्य पातळीवरील दहशतवाद विरोधी पथक तसेच केंद्रीय तपास यंत्रणांनी अशांच्या मुसक्या वेळीच आवळून दणका दिला असला, तरी ती यादी मात्र वाढतच जात असल्याने घरभेद्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे अशा घरभेद्यांना वेळीच आवळण्याची वेळ आली आहे.
प्रदीप कुरुलकर ते ज्योती मल्होत्रा यादी संपता संपेना
गेल्या काही वर्षात हेरगिरीच्या आरोपात सर्वात संवेदनशील अटक डीआरडीओ वैज्ञानिक प्रदीप कुरुलकरची (Pradeep Kurulkar WhatsApp leak case) होती. मुलीच्या वयाच्या तरुणीशी चाळे करण्याच्या नादात प्रदीप कुरुलकरने थेट मिसाईल, ड्रोन आणि रोबोटिक्स प्रणालीची अत्यंत संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिली होती. पाकिस्तानी आयएसआय महिला एजंटला ही माहिती व्हाॅटसअॅपमधून दिली होती. सध्या त्याच्यावर खटला सुरु आहे. 2020 पासून ते आतापर्यंत 11 नौसैनिकांसह 18 जणांना अटक करण्यात आली आहे. यामधील बहुतांश महिला एजंटच्या हनीट्रॅपमधून पाकिस्तानच्या गळाला लागले आहेत.
चालू वर्षात पाच जणांना अटक, हनीट्रपमधून दोघांना अडकवले
चालू वर्षात पाकिस्तानी हनीट्रॅप आणि आयएसआयच्या जाळ्यात अडकून संवेदनशील माहिती देत गद्दारी करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळण्यापूर्वी देशातील तपास यंत्रणांकडून भटिंडा पंजाबमधून रकीब खानला अटक करण्यात आली. त्याच्यावर भटिंडा कँटोमेंटमधून फोटो पाकिस्तानी हँडलरला पाठवल्याचा आरोप होता. तत्पूर्वी मार्च महिन्यात सुनील कुमार रामला सुद्धा तेथून अटक करण्यात आली. त्याच्यावर युनिटची लोकेशन डिटेल्स पाठवल्याचा आरोप होता. मार्च 2025 मध्ये रविंद्र कुमार आणि शाहबाज खानला कानपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली. या दोघांना नेहा शर्माच्या नावाने हनीट्रॅप झाला होता. या दोघांनी तांत्रिक माहिती पुरवण्याचे काम केले होते.
11 नौदल कर्मचारी आणि दोन नागरिकांना अटक
डिसेंबर 2020 मध्ये आंध्र प्रदेश पोलिसांनी नौदलाच्या गुप्तचर विभागाशी संयुक्तपणे सहकार्य करत एका कथित हेरगिरी प्रकरणात 11 नौदल कर्मचारी आणि दोन नागरिकांसह तेरा जणांना अटक केली होती. पाकिस्तानी आयएसआयच्या एजंटांनी सोशल मीडियावर त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते आणि त्यानंतर यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलद्वारे भारतीय नौदलाशी संबंधित संवेदनशील माहिती लीक केली होती, असे उघड झाले.
आएफएस अधिकारी आणि जवानही अटकेत
2007 मध्ये IFS अधिकारी माधुरी गुप्ताला (Madhuri Gupta Islamabad cable leak) अटक करण्यात आली. माधुरी इस्लामाबाद उच्चायुक्तालयात सेकंड सेक्रेटरी (प्रेस & माहिती) अधिकारी होती. ऑक्टोबर 2009 ते 2010 या कालावधीत ISI हँडलर सोहैल 23 गोपनीय माहिती पाठवली होती. माधुरीला दिल्लीत अटक करुन गुन्हे दाखल करण्यात आले. 2018 मध्ये तीन वर्षाची शिक्षा पूर्ण झाली. 2021 मध्ये कोरोना महामारीचे माधुरीचा मृत्यू झाला. ऑगस्ट 2019 मध्ये BSF हेड कॉन्स्टेबल पंकज शर्माला अटक करण्यात आली. माधुरीची ऑगस्ट 2019 मध्ये Facebook वर अनिका चोप्राशी ओळख झाली होती. त्याला राजस्थान ATS कडून अटक करण्यात आली. WhatsApp ने रोस्टर फोटो लीक केल्याचा आरोप त्याच्यावर होता.
मार्च 2016 मध्ये आयटी व्यावसायिक ध्रुव सक्सेनाला अटक करण्यात आली. त्याच्याकडे शेकडो बनावट सीम कार्ड सापडली होती. 8 फेब्रुवारी 2017 मध्ये मध्य प्रदेश ATS छापे टाकत अटक केली होती. ऑगस्ट 2017 मध्ये त्याला जामीन मिळाला असून खटला प्रलंबित आहे. जुलै 2020 मध्ये सज्जन तिवारी या BSF कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली. तो अनिका चोप्राशी चॅट करत होता आणि हनीट्रॅपमध्ये सापडला. 2021 मध्ये राजस्थान एटीएसकडून अटक करण्यात आली. त्याच्याकडे 17 हजारांचे गिफ्ट कार्ड सापडले होते. जून 2023 मध्ये आरोप निश्चित करण्यात आले. तथापि, कोर्ट मार्शल थांबवला. आर्मी लान्स नाईक निर्मल रायला 28 ऑगस्ट 2020 मध्ये अटक केली होती. त्याला मिलिटरी इंटेलिजन्सने अटक केली होती.
इजिप्शियन महिला हनीट्रॅपमध्ये अडकलेला बीएसएफ जवान
यूपी एटीएसच्या नोएडा युनिटने हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली बीएसएफ अच्युतानंद मिश्राला अटक केली होती. तो मूळचा मध्य प्रदेशातील रेवा येथील आहे. सोशल मीडियावर आयएसआय एजंट असलेल्या महिलेच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर तो सैन्यावर हेरगिरी करत होता. एटीएसने सांगितले की, महिलेने स्वतःची ओळख इजिप्शियन नागरिक आणि लष्कराची रिपोर्टर म्हणून करून दिली. सुरुवातीला फेसबुकवर चॅटिंग झाले. नंतर व्हिडिओ कॉलद्वारे संभाषणही झाले. अटक केलेला जवान पाकिस्तानी नंबरवर महिलेशी सतत बोलत होता. एजंटने पाकिस्तानविरोधी गोष्टी बोलून जवानाला आपल्या जाळ्यात अडकवले होते. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी लष्कराचा दहशतवादी आदिल उर्फ संदीप शर्माला अटक केली होती. संदीप शर्मा हा उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरचा रहिवासी आहे. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात संदीप कुमारचाही सहभाग होता ज्यामध्ये सहा पोलिस ठार झाले होते.
कशा पद्धतीने ट्रॅप केले जाते?
पाकिस्तानकडून सातत्याने हनीट्रॅपचा वापर संवेदनशील माहिती चोरण्यासाठी झाला आहे. यासाठी फेक महिला प्रोफाईलचा खुबीने वापर केला जातो. यामध्ये डेटा पाठवण्याचे माध्यम WhatsApp, Signal, ई‑मेल आदी माध्यमांचा वापर केला जातो. यासाठी बहुतेकांना अगदी एक लाखांपेक्षा कमी किंवा काहींना केवळ भावनिक करून माहिती चोरण्याचा प्रयत्न केला आहे. लीक केलेली माहितीमध्ये सीमारेषा रोस्टर, तोफ हालचाली, क्षेपणास्त्र R&D, डिप्लोमॅटिक केबल्स, SIM‑आधारित कनेक्शनचा माहिताची समावेश आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून रोमान्स + माहिती फॉर्म्युला वापरून कमी खर्चात हेरगिरी करून घेतली जाते. अल्प रक्कमेत किंवा केवळ भावनिक फायद्यातून संवेदनशील माहिती पाकिस्तानला मिळते.
इतर महत्वाच्या बातम्या























