(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Arun Kumar Sinha: स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे संचालक अरूणकुमार सिन्हा यांचं निधन, गुरूग्राममधील रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास
पंतप्रधान जगात कुठेही गेले तरी त्यांच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी एसपीजींवरच असते. जी-20 परिषदेला अवघे चार दिवस शिल्लक असताना सिन्हा यांचं निधन झालं आहे.
नवी दिल्ली : स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (Special Protection Group) संचालक अरूणकुमार सिन्हा यांचं निधन (Arun Kumar Sinha Passed Away) झाले आहे. गुरूग्राममधील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. वयाच्या 61 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1987 च्या केरळ केडरचे अधिकारी होते. त्यांना अलीकडेच मुदतवाढ देण्यात आली होती. भारतात पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एससपीजीकडे असते. पंतप्रधान जगात कुठेही गेले तरी त्यांच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी एसपीजींवरच असते. जी-20 परिषदेला अवघे चार दिवस शिल्लक असताना सिन्हा यांचं निधन झालं आहे.
2016 अरूण कुमार सिन्हा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे संचालक म्हणून ते काम पाहत होते. 4 सप्टेंबरला मेदांता रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिन्हा यांनी झारखंड येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. केरळ पोलिसात त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केले होते. डीसीपी, आयुक्त,रेंज आयजी, इंटेलिजेंस आयजी आणि अॅडमिनिस्ट्रेशन आयजी यासारख्या पदावर ते कार्यरत होते. मोदी (PM Modi) सरकार सत्तेत आल्यानंतर 2016 पासून ते जबाबदारी पाहत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना इमेलवरून आलेल्या धमकी प्रकरणाचा तपास त्यांनी केला होता.
Arun Kumar Sinha, the Director of the Special Protection Group (SPG), passed away at a hospital in Gurugram. He was 61 and was unwell. Sinha was a 1987 batch Kerala cadre IPS Officer. He was recently given an extension in service.
— ANI (@ANI) September 6, 2023
(File pic) pic.twitter.com/d93lJTAqW5
31 ऑक्टोबर 1984 साली इंदिर गांधी यांची हत्या झाली त्यानंतर 1988 साली संसदेत एसपीजी अॅक्ट आणण्यात आला आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. एससपीजीकडे पंतप्रधानांच्या संरक्षणाची जबाबदारी असते. माजी पंतप्रधानांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे नसते. त्यामुळेच 1989 मध्ये वीपी सिंह सरकारने राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची सुरक्षा हटवली. 1991 साली राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर एसपीजीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. माजी पंतप्रधान आणि त्यांच्या परिवाराला पंतप्रधान पद गेल्यानंतर 10 वर्षे एसपीजी (SPG) सुरक्षा देण्यात आली.
हे ही वाचा :