Yoga Day 2022 : 17 हजार फूट उंचींवर जवानांचा उत्साह, बर्फाच्छित प्रदेशात ITBP चा योगा
ITBP Perform Yoga : आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्तानं सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह इतर बर्फाळ प्रदेशआत आईटीबीपी (ITBP) जवानांनी हजारो फूट उंचीवर योगासनं केली.
ITBP Perform Yoga in Uttarakhand : आज 21 जून रोजी जगभरात आठवा आंतरराष्ट्रीय योगा दिवस (International Yoga Day 2022) साजरा केला जात आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस म्हणजेच आयटीबी (ITBP) जवानांनीही हजारो फूट उंचीवर योगा दिवस साजरा केला आहे. सिक्कीममध्ये (Sikkim) आईटीबीपी जवानांनी 17 हजार फूट उंचीवर योगा करत दिवसाची उत्साही सुरुवात केली. तर उत्तराखंडमध्येही आयटीबी जवानांनी बर्फाच्छादित पर्वतावर योगाभ्यास केला. इंडो-तिबेट सीमा पोलीस दलातील (ITBP) हिमवीरांनी आंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने (International Yoga Day 2022) उत्तराखंडमध्ये 14 हजार 500 फूट उंचीवर योगा केला.
आईटीबीपी (ITBP) जवानांनी उत्तराखंड हिमालयातील 22 हजार 850 फूट उंचीवर बर्फाच्या मध्यभागी योगासनं केली. ITBP गिर्यारोहक गेल्या आठवड्यात माउंट अबी गामिनच्या शिखरावर होते, तिथे जवानांनी बर्फाच्छादित पर्वतांवर योगाभ्यास केला.
17000 फूट उंचीवर ITBP जवानांचा योग
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, हिमवीर उत्तराखंडमध्ये 14,500 फूट उंचीवर योगासने करतात. याशिवाय आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अरुणाचल प्रदेश, सिक्कीमसह देशातील इतर अनेक भागात आयटीबीपीच्या जवानांनी हजारो फूट उंचीवर योगासने केली.
Himveers of Indo-Tibetan Border Police (ITBP) perform Yoga in Ladakh at 17,000 feet, on the 8th #InternationalDayOfYoga pic.twitter.com/SpmFre6w1J
— ANI (@ANI) June 21, 2022
इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांचे हिमवीर देशाच्या पूर्वेकडील एटीएस लोहितपूर येथे योगासनं केली. सिक्कीममध्ये 17 हजार फूट उंचीवर सैनिकांनी योगा केला.
#WATCH | Himveers of Indo-Tibetan Border Police (ITBP) perform Yoga at an altitude of 14,500 feet in Uttarakhand, on the 8th #InternationalDayofYoga
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 21, 2022
(Source: ITBP) pic.twitter.com/OdYPrzpz09
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )