International Airfares : आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास स्वस्त होणार? भारताचा 116 देशांसोबत करार
International Airfares May Get Cheaper : भारताने 116 देशांसोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत भारताने परदेशी विमान कंपन्यांना (Foreign Airlines) भारतातील महानगरांसोबत जोडण्यासाठी परवानगी दिली आहे.
International Airlines : भारत सरकारने (Indian Government) 116 देशांसोबत हवाई प्रवासासंबंधातील करार केला आहे. या द्विपक्षीय करारामुळे (Bilateral Air Service Agreements) येत्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास स्वस्त होणार आहे. या कराराअंतर्गत भारताने परदेशी विमान कंपन्यांना (Foreign Airlines) भारतातील महानगरांसोबत जोडण्यासाठी परवानगी दिली आहे. भारताने 116 देशांसोबत हा करार केला आहे. यामध्ये आशिया, युरोप, मध्य पूर्व आणि दक्षिण अमेरिकेतील देशांचा समावेश आहे. यामुळे आगामी काळात आंतरराष्ट्रीय प्रवास स्वस्त होण्याची शक्यता प्रवास उद्योगातील (Travel Industry) तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
एसटीआयसी टॅव्हल ग्रुपचे व्यवसाय विकास संचालक (Group Business Development) अंजू वरिया यांनी सांगितलं आहे की, केंद्र सरकारने आसन क्षमता वाढवण्यासाठी आणि परदेशी विमान कंपन्यांना महानगरांसोबत जोडण्यासाठी केलेल्या या करारामुळे नागरिकांना याचा फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास स्वस्त झाल्यास याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.
सरकारने म्हटलं आहे की, परदेशी विदेशी कंपन्यांच्या बाजूने पॉईंट ऑफ कॉल्सच्या बाबतीत मोठा असमतोल आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून प्रवासी सेवा चालवण्यासाठी कोणत्याही गैर-मेट्रो विमानतळाला किंवा परदेशी विमान कंपनीला पॉईंट ऑफ कॉल्सची परवानगी दिली जाणार नाही. मागील काही काळापासून महानगरांव्यतिरिक्त अन्य शहरांसोबत परदेशी विमान कंपन्यांना जोडण्यासाठी ट्रॅव्हल इंडस्ट्रीकडून मागणी करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या