Chhattisgarh : पोलीस चकमकीत नक्षलवाद्यांचा कुख्यात कमांडर ठार,आठ लाखाचे होते बक्षीस
Sukma encounter : खात्मा करण्यात आलेला नक्षलवादी हा DVCM चा कमांडर असून त्याचे नाव हडमा उर्फ सनकू असल्याची माहिती समोर आली आहे. या नक्षलवादी कमांडरवर आठ लाख रुपयाचे बक्षिस घोषित करण्यात आले होते.
Naxalites killed in Sukma encounter : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी डीआरजीचे जवान आणि नक्षलवादी चकमकीच आठ लाखांचे बक्षिस असलेला कुख्यात नक्षलदवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. खात्मा करण्यात आलेला नक्षलवादी हा DVCM चा कमांडर असून त्याचे नाव हडमा उर्फ सनकू असल्याची माहिती समोर आली आहे. या नक्षलवादी कमांडरवर आठ लाख रुपयाचे बक्षिस घोषित करण्यात आले होते.
छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत खात्मा केलेला हडमा उर्फ सनकू सुकमा आणि संभाग जिल्ह्यातील अनेक नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती आहे. भेज्जी येथे CRPF च्या जवानांवर झालेला हल्ला त्याचबरोबर बुर्कापाल हल्ला ज्यामध्ये 25 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामध्ये सनकू देखील सहभागी होता.
सुकमा जिल्ह्यातील एएसपी ओ.पी चंदेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलग्रस्त भेज्जीच्या जंगलात नक्षलवादी असल्याची पोलिसांनी माहिती मिळाली. माहिती मिळताच DRG आणि CRPF च्या जवानांना पाठवण्यात आले. त्यानंतर जवानांनी परिसरला घेरण्यास सुरुवात केली त्यावेळी दोन नक्षलवादी जवानांनी झाडावर दिसले. नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. जवळपास तासभार गोळीबार सुरू होता. गोळीबार थांबल्यानंतर पोलिसांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. तर पोलिसांना एक गणवेशात असलेल्या नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला.
एएसपीने सांगितले की, खात्मा करण्यात आलेला नक्षलवादी गेल्या 13 वर्षापासून माढ परिसरात सक्रिय होते. त्यांच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांची दहशत कमी झाला. हडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चकमकीनंतर शोध अभियानात घटनास्थळी शोधमोहीम राबवली जात आहे.
संबंधित बातम्या