एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्वतंत्र भारतातील प्रजासत्ताक दिनाची पहिली परेड कुठे झाली माहितीय का?
26 जानेवारी 1950 रोजी देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. पण हा प्रजासत्ताक दिन राजपथावर नव्हे, तर इर्विन स्टेडियम ( सध्याचं नॅशनल स्टेडियम)वर झाला.
नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमानिमित्त राजपथावर भारताची सांस्कृतिक परंपरा, विविध क्षेत्रातील योगदान, तसेच देशाच्या सामर्थ्याचं दर्शन संपूर्ण जगाला घडवलं जातं.
पण स्वतंत्र भारतातील पहिला प्रजासत्ताक दिन कुठे झाला? असा प्रश्न विचारला, तर याचं उत्तर अनेकांना माहिती नसतं. पण आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.
26 जानेवारी 1950 रोजी देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. पण हा प्रजासत्ताक दिन राजपथावर नव्हे, तर इर्विन स्टेडियम ( सध्याचं नॅशनल स्टेडियम)वर झाला. विशेष म्हणजे, 1950 ते 1954 पर्यंत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम इर्विन स्टेडियम, किंग्सवे, लाल किल्ला, रामलीला मैदान आदी ठिकाणी झाला.
पण 1955 पासून प्रजासत्ताक दिन राजपथावर साजरा करण्याची परंपरा सुरु झाली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम राजपथावर मोठ्या उत्साहात होतो. या कार्यक्रमानिमित्त आयोजित करणाऱ्या संचलनाची सुरुवात, रायसीना हिल्सवरुन होते. इथून राजपथ, इंडिया गेट मार्गे लाल किल्ल्यावर येऊन ती संपते.
सन 2016 मध्ये देशाच्या इतिहासात पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय जवानांसह फ्रान्सच्या सैनिकांनीही सहभाग घेतला. तब्बल 67 वर्षांनी ही ऐतिहासिक घटना घडली. या कार्यक्रमासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांसवा ओलांदा हे प्रमुख पाहुणे होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement