Raja Raghuvanshi Case: 'किडे बाहेर येत होते', राजा रघुवंशीच्या भावानं सांगितली आपबिती; तरूण मुलांना केलं कळकळीनं आवाहन
Raja Raghuvanshi Case:राजाच्या मृत्युनंतर एका आठवड्याने जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा तो खूपच वाईट अवस्थेत होता. शरीरातून किडे बाहेर पडत होते. राजाच्या भावाने मृतदेह पाहताच त्याच्या मनात आलेले विचार सांगितले.

Raja Raghuvanshi Case: इंदौरमधील राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम हनिमुनला (Raja Raghuvanshi Case) गेल्यानंतर तिने आपल्या कथित प्रियकरासह पतीची हत्या केली. पत्नी सोनमने तिच्या पती राजाला मारून टाकले. या घटनेनंतर सुमारे 10 दिवसांनी राजा रघुवंशी यांचा मृतदेह (Raja Raghuvanshi Case) एका खोल दरीत आढळून आला. जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा त्यातून किडे बाहेर पडत होते. या घटनेचा लोकांवरही खूप खोलवरती परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या घटनानंतर लग्नाबाबत एका वेगळ्याच प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. आता या विषयावर बोलताना राजा रघुवंशी यांचे भाऊ विपिन रघुवंशी यांनीही तरूण मुलांना आवाहन केले आहे.
राजाच्या भावाची तरूण मुलांना विनंती
2 जून रोजी जेव्हा राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडला तेव्हा तो पूर्णपणे कुजलेला होता. चेहरा सांगाड्यात बदलला होता आणि शरीरावर किडे पडले होते. ही माहिती राजाचा भाऊ विपिन रघुवंशी यांनी दिली आहे. विपिन यांनी सांगितले की, त्यांना राजाचा मृतदेह पाहता आला नाही. जेव्हा मी मृतदेह पाहिला तेव्हा माझ्या मनात फक्त एकच गोष्ट आली की कोणीही अरेंज मॅरेज करू नये. यादरम्यान, राजाचा भाऊ विपिनने मुलांना आवाहन केले आणि सांगितले की काहीही झाले तरी अरेंज मॅरेज करू नका.
23 मे रोजी सोनम रघुवंशीने तिचा पती राजा रघुवंशीची हत्या केली. या घटनेत सोनम रघुवंशीसह चार जणांना मेघालय पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेतील इतर तीन आरोपींमध्ये सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाहाचाही समावेश आहे.राज कुशवाहा व्यतिरिक्त, आणखी दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. असे म्हटले जात आहे की सोनमने राज कुशवाहाशी लग्न करण्यासाठी राजा रघुवंशीची हत्या केली.
या घटनेनंतर सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंदनेही राजाच्या कुटुंबाला पाठिंबा दिला. गोविंद म्हणाला की जर त्याची बहीण दोषी असेल तर तिला फाशी देण्यात यावी. गोविंद म्हणाला की राजा त्याच्या भावासारखा होता. याशिवाय, गोविंद अलीकडेच राजाच्या पिंडदानाच्या वेळी राजाच्या कुटुंबासह उज्जैनला पोहोचला होता.
सोनम आणि राज यांच्यात काय झालेलं बोलणं?
शिलाँग पोलिसांनी गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले तेव्हा सोनम आणि मारेकऱ्यांनी अवघ्या 18 मिनिटांत ही हत्या केल्याचे उघड झाले. यासोबतच शिलाँग पोलिसांना सोनम आणि राज दोघांच्याही जुन्या चॅट्स आणि रेकॉर्डिंग ताब्यात घेतल्या आहेत, ज्यामध्ये सोनमचा आवाज आहे. चॅटमध्ये राजने लिहिले होते की जर तो आपल्या मधून बाजूला झाला तर सर्व काही सोपं होईल. सोनमने लिहिलं होतं की आपण दोघे पुन्हा एकत्र येऊ. हे पुरावे न्यायालयासाठी महत्त्वाचे आहेत. पोलीस ते आरोपपत्रात जोडणार आहेत.
‘काळजी करू नकोस, सगळं वेळेवर होईल’
व्हायरल चॅटमध्ये राज म्हणतो की ‘काळजी करू नकोस, सगळं वेळेवर होईल. सगळं काही निश्चित आहे, फक्त त्याला घेऊन ये. मेघालयात सर्व मी माझ्या पद्धतीने करायचं ते करेल. यावर सोनम उत्तर देते की 'मलाही तेच हवे आहे. एकदा हे सर्व झाले की आपण शांततेत जगू.'
























