एक्स्प्लोर

Indigo : इंडिगो फ्लाईट की रेल्वेचा जनरल डब्बा? ओव्हरबूक झाल्यानंतर उभ्या प्रवाशासह विमानाने घेतलं उड्डाण, जाणून घ्या पुढे काय झालं

Indigo Flight : विमानातल एक प्रवासी उभा असल्याची माहिती क्रू मेंबरने पायलटला दिली आणि विमान पुन्हा टर्मिनलवर आणण्यात आलं. 

मुंबई: भारतीय रेल्वेच्या जनरल डब्यांमध्ये प्रवाशांच्या गर्दीच्या कहाण्या आपण  ऐकतो, त्याचे फोटो आणि व्हिडीओ हे नेहमीच पाहतो. पण रेल्वेची ही स्थिती विमानामध्ये आली तर? विमानामध्ये तसं काही होत नाही असा जर तुमचा समज असेल तर तो इंडिगोच्या फ्लाईटने चुकीचा ठरवलाय. मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या विमानात एक प्रवासी उभा होता, त्याला जागा मिळाली नव्हती. अशाही स्थितीत त्या विमानाने उड्डाण घेतल्याचं समोर आलं आहे. 

मंगळवारी (21 मे) मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात हे चित्र पाहायला मिळाले. इंडिगोच्या या विमानाचे ओव्हरबुकिंग असल्याने एक प्रवासी फ्लाईटच्या मागच्या बाजूला उभा होते. आश्चर्यकारक बाब म्हणजे विमानानेही योग्य प्रकारे उड्डाण केले होते. मात्र नंतर विमान पुन्हा विमानतळावर उतरवण्यात आले.

प्रवासी विमानाच्या मागे उभा होता

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी आठच्या सुमारास मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये क्रू मेंबरला एक व्यक्ती विमानाच्या शेवटी उभी असल्याचे दिसले. तोपर्यंत विमान टेक ऑफ करणार होते.

क्रू मेंबरने त्या ठिकाणी प्रवासी उभा असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी वैमानिकाला याची माहिती दिली. यानंतर विमान पुन्हा टर्मिनलवर आणण्यात आले. मात्र यासंदर्भात एअरलाइन्सकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही. सामान्यतः एअरलाईन्स रिकाम्या जाऊ नयेत म्हणून कंपन्यांकडून फ्लाईट ओव्हरबुक केली जाते.

विमान टर्मिनलवर परत आणले

विमान टर्मिनलवर परत आल्यानंतर त्या व्यक्तीला उतरवण्यात आले. विमान कंपन्यांकडून प्रत्येकाच्या केबिनचे सामान तपासले गेले आणि विमानाचे टेकऑफ सुमारे एक तास उशिराने झाले.

2016 मध्ये डीजीसीएमने जारी केलेल्या नियमांनुसार, विमानाने उड्डाण केल्यानंतर एका तासाच्या आत प्रवाशाला दुसरे विमान उपलब्ध करून दिल्यास त्या प्रवाशाला कोणतीही भरपाई द्यावी लागत नाही.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget