(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Neeraj Chopra: 'सुवर्णवेध' करणाऱ्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, 'इंडिगो' ने नीरजला दिली एक वर्ष फ्री विमानसेवा
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे. आता भारतीय कंपनी इंडिगोने नीरज चोप्राला एक भेट दिली आहे.
Neeraj Chopra wins Gold Medal : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णफेक करत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. नीरजनं इतिहास रचत चमकदार कामगिरी नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तब्बल 13 वर्षानंतर म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे. आता भारतीय कंपनी इंडिगोने नीरज चोप्राला एक भेट दिली आहे. नीरजला एक वर्ष फ्री विमानसेवा देण्यात आली आहे. इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्त यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
या विषयी सांगताना दत्त म्हणाले, नीरजने ऐतिहासिक कामगिरी करत देशाचे नाव केले आहे. इंडिगोचे सर्व कर्मचारी तुम्हाला विमान सेवा देताना अभिमानाने स्वागत करतील. तुमच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी इंडिगो तुम्हाला एक वर्ष विनामूल्य विमानसेवा देत आहे.
Our humble felicitation offer for @Neeraj_chopra1 from @IndiGo6E. And as our CEO Rono added, “Neeraj , we sincerely hope you will avail of our offer, to travel extensively across the country, to spread your message of hope and inspiration to aspiring young athletes across India! pic.twitter.com/YbMjpZCpYW
— C Lekha (@ChhaviLeekha) August 7, 2021
7 ऑगस्टपर्यंत नीरजला फ्री विमानसेवा
इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, भविष्यात अनेक भारतीय खेळाडूंना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. नीरजला पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत विनामूल्य प्रवास करता येणार आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे सोप्पी गोष्टी नाही. त्यासाठी खूप मेहनत आणि स्वतःवर विश्वास असणं आवश्यक असतं. सोबतच कोट्यवधी भारतीयांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादही सोबत असतात. यात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजवर बक्षिसांचा वर्षाव होतोय.
नीरज चोप्राला हरियाणा सरकारनं 6 कोटी रुपयांसह क्लास वन अधिकारी पदावर सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारकडून देखील नीरज चोप्राला दोन कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. सोबतच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने नीरजचं कौतुक करत एक कोटी रुपयांचं बक्षीस दिलं आहे तर आयपीएल फ्रंचायजी चेन्नईनं देखील एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे
ऑलिम्पिकमध्ये 13 वर्षानंतर सुवर्ण पदक
ऑलिम्पिकमध्ये भारतातसाठी हे दुसरं वैयक्तिक गोल्ड मेडल आहे. याआधी 13 वर्षांपूर्वी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्याआधी भारताने हॉकीमध्ये 8 सुवर्ण पदक जिंकले आहेत.
संबंधित बातम्या :