एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Corona Virus | भारतात कोरोना व्हायरसचा शिरकाव, केरळमध्ये पहिला रुग्ण सापडला!

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 169 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान हा व्हायरस वेगाने जगभर पसरत असल्याचं दिसत आहे. आता भारतातही या व्हायरसने शिरकाव केला आहे.

नवी दिल्ली : जगभरात दहशत पसरवलेल्या कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव झाला आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेला रुग्ण केरळमध्ये सापडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. मूळचा केरळमधील असलेला संबंधित रुग्ण हा चीनमधल्या वुहान विद्यापीठातील विद्यार्थी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोना व्हायरसची सुरुवात वुहान प्रांतातून झाली आहे.

दरम्यान कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत 169 जण दगावले आहेत. या विषाणूच्या विळख्यात आता चीनमध्ये शिकणाऱ्या 27 भारतीय सापडले आहेत. त्यात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे. हे विद्यार्थी सीयानीगमधील हुबे युनिवर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत आहेत. सात महाराष्ट्रीयन मुलांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेडमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. भारतातून तब्बल 23 हजार विद्यार्थी चीनमध्ये शिकायला जातात, त्यातील 21 हजार वैद्यकीय शिक्षणासाठी आहेत.

Corona Virus | चीनमधील हुबे विद्यापीठात 27 भारतीय अडकले, 7 विद्यार्थी महाराष्ट्रातले!

कोरोना व्हायरस म्हणजे काय? प्राण्यांपासून या विषाणूचा मनुष्याला संसर्ग होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरु शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

कोरोना व्हायरसची लक्षणे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.

विषाणूचा प्रसार कुठून होऊ लागला? कोरोना व्हायरस पहिल्यांदा चीनच्या वुहान शहरातून पसरु लागला आणि त्यानंतर याचे पीडित रुग्ण थायलंड, सिंगापूर, जपानमध्येही आढळून आले. काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये एका कुटुंबाला या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं होतं.

चीनमधून कसा पसरला व्हायरस? चीनमधील 7711 लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे तर इतर देशातील 70 लोकांना संसर्ग आहे. 1370 रुग्ण गंभीर आहेत तर 12, 167 संशयित रुग्ण आहेत. तब्बल 81 हजार 947 डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. चीनमधून 17 देशात घातक विषाणू पसरला. 2002-200३ साली चीनमध्ये आलेल्या सार्स रोगापेक्षा कोरोना व्हायरस जास्त पसरला. सार्समुळे 700 बळी गेले होते. कोरोना व्हायरसची सुरुवात वुहान प्रांतात झाली.

संबंधित बातम्या

चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचे 25 बळी, मुंबई-पुण्यात 5 संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

अल्पावधीतच डझनहून अधिक देशांत 'कोरोना व्हायरस'ची लागण; मृतांची संख्या 100 वर

EXPLAINER VIDEO | कोरोना व्हायरस नेमका कसा पसरला? तुम्ही काळजी कशी घ्याल? बातमीच्या पलीकडे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget