एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंग्रजी माध्यमात शिक्षण, बॉम्ब बनवण्यात तरबेज, अब्दुल कुरेशीला बेड्या
अब्दुल सुभान कुरेशीला बेड्या ठोकल्या आहेत.
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारताला ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी सापडला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने, इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या, अब्दुल सुभान कुरेशीला बेड्या ठोकल्या आहेत.
राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट करण्याचा कट त्याने रचला होता. अब्दुल कुरेशी हा भारताचा ‘लादेन’ म्हणून परिचीत होता.
महत्त्वाचं म्हणजे इंग्रजी माध्यमातून शिकलेला अब्दुल कुरेशी हा देशातील अनेक बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. दिल्लीतील गाजीपूर परिसरातून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोण आहे अब्दुल उर्फ तौकीर कुरेशी?
अब्दुल उर्फ तौकीर कुरेशीवर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने चार लाखांचं इनाम ठेवलं होतं. हा भारताचा मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे.
पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अब्दुल कुरेशीने देशातील अनेक नामांकित प्रायव्हेट कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या केल्या आहेत.
अब्दुल बॉम्ब बनवण्यात तरबेज होता. तो ट्रेनिंग कॅम्पही चालवत असे. सिमी या बंदी असलेल्या संस्थेचा तो प्रमुख होता. त्याच्या सगळ्या प्रकरणामुळे त्याला भारतातील लादेन म्हणून ओळखलं जात होतं.
पी चिदंबरम जेव्हा गृहमंत्री होते, तेव्हा 50 वॉण्टेड दहशतवाद्यांची यादी जाहीर केली होती आणि यात आयएमचा दहशतवादी कुरेशीच्या नावाचाही समावेश होता.
कुरेशी गेल्या वर्षांपासून नेपाळमध्ये वास्तव्यास होता. तो सौदी अरेबियालाही जाऊन आला. काही दिवसांपूर्वीच तो दिल्लीत आपल्या सहकाऱ्याला भेटायला आला होता.
अनेक बॉम्बस्फोटाचा आरोप
अब्दुल उर्फ तौकीर कुरेशी हा 1999 आणि 2000 दरम्यान अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. भारतात 2007 ते 2013 दरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात त्याचा हात होता.
2008 मध्ये गुजरातमधील अहमदाबाद आणि सुरतमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड होता. या स्फोटात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 238 जण जखमी होते.
कुरेशीने 2007-08 मध्ये सिमीचे 4 ट्रेनिंग कॅम्प बनवले होते.
तीन दिवसांपूर्वीच बिहारच्या बोधगया इथं काही स्फोटकं सापडली होती, त्याचा अब्दुलशी काही संबंध आहे का, याची चाचपणी सुरु आहे.
संंबंधित बातम्या
मोठा कट उधळला, इंडियन मुजाहिद्दीनच्या संस्थापकाला दिल्लीत बेड्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement