एक्स्प्लोर

शत्रूच्या भूमीवर जाऊन गोळ्या झाडणारा भारतमातेचा वीर, अवघ्या 26 व्या वर्षी फासावर चढले मदनलाल धिंग्रा

Madan Lal Dhingra Death Anniversary : मदनलाल धिंग्रा यांनी इंग्लंडमध्ये त्यांच्याच भूमीवर जाऊन सर विल्यम हट कर्झन वायली या इंग्रज अधिकार्‍याचा समोरून गोळ्या घालून खून केला होता. या खूनानंतर अवघ्या एका महिन्यात मदनलाल यांना फाशीची शिक्षा सुनावली.

Madan Lal Dhingra Death Anniversary : ज्या इंग्रजांनी आपल्या क्रूर आणि जुलमी राजवटीच्या जोरावर दीडशे वर्षे भारतावर राज्य केले. ते जुलमी राज्य उलथवून टाकण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले. तर अनेकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. त्यापैकीच एक म्हणजे वीर क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा.  

मदनलाल यांनी इंग्लंडमध्ये त्यांच्याच भूमीवर जाऊन सर विल्यम हट कर्झन वायली या इंग्रज अधिकार्‍याचा समोरून निधड्या छातीने पाच गोळ्या घालून खून केला. या खूनानंतर अवघ्या एका महिन्यात मदनलाल यांना फाशीची शिक्षा सुनावली. 18 फेब्रुवारी 1883 रोजी जन्मलेले मदनलाल 17 ऑगस्ट 1909 रोजी वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी भारत मातेसाठी फासावर लटकले. प्रत्यक्ष शत्रूच्या भूमीवर राहून, त्यांच्याच उच्चाधिकार्‍यास मारण्याचा पहिला मान मदनलाल धिंग्रा यांनी मिळवून इतिहासात आपले नाव सुवर्णक्षरांनी कोरून ठेवले.  

मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1883 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील दित्तमल धिंग्रा हे सुप्रसिद्ध सिव्हिल सर्जन होते. ते ब्रिटिश सत्तेचे विश्वासू म्हणून ओळखले जात. परंतु,मदनलाल हे ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या वृत्तीच्या विरोधात होते, त्यामुळे वडील मदनलाल यांच्यावर नाराज होते.  

मदनलाल यांचे प्राथमिक शिक्षण अमृतसर येथेच झाले. त्यानंतरचे शिक्षण त्यांनी अमृतसरमधील एमबी इंटरमिजिएट कॉलेजमध्ये घेतले आणि नंतर लाहोरमधील सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. परंतु, 1904 मध्ये विद्यार्थीदशेत असतानाच स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या क्रांतिकारकांबद्दल सहानुभूती असल्यामुळे त्यांना लाहोरमधील महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर कुटुंबाने मदनलाल यांच्यासोबतचे संबंध तोडले. त्यामुळे मदनलाल यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी काम करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. प्रथम त्यांनी लिपिक म्हणून काम केले. नंतर ब्रिटिश पर्यटक आणि शिमल्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी टांगा चालवण्याचे काम केले. त्यानंतर 1906 मध्ये त्यांच्या मोठ्या भावाच्या सल्ल्यानुसार मदनलाल उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. तेथे त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये यांत्रिक तंत्रज्ञानाचे शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि येथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटनी मिळाली.

लंडनमध्ये शिकत असताना मदनलाल हे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांना भेटले. मदनलाल हे लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये राहत होते. इंडिया हाऊस हे भारतीय विद्यार्थ्यांच्या राजकीय चर्चांचे केंद्र होते. दरम्यानच्या काळात इंग्रजांनी खुदीराम बोस, कन्हैलाल दत्त, सतींदर पाल आणि काशीराम या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिल्याबद्दल आणि इंग्रजांनी भारतीयांवर केलेल्या अन्यायामुळे इंडिया हाऊसमधील सर्व भारतीय तरुण देशभक्त खूप संतापले होते. हे सर्व पाहून मदनलाल यांच्या मनात ब्रिटीश राजवटीविरुद्ध आधीच असलेली आग आणखीनच पेटली. त्याचवेळी त्यांनी बदला घेण्याचे ठरवले आणि कर्झन वायली याचा खून करण्याचे मनात पक्के केले. 

कर्जन वायली याचा खून करण्याची पूर्ण योजना आखून 1 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंग्रा लंडनमधील 'द नॅशनल इंडियन असोसिएशन'च्या वार्षिक कार्यक्रमात सहभागी झाले. याच कार्यक्रमात कर्झन वायली देखील उपस्थित होता. कार्यक्रम संपल्यानंतर कर्झन वायली हॉलच्या बाहेर येत असताना मदनलाल यांनी अगदी जवळून त्याच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यातील चार गोळ्या कर्झन याच्या चेहऱ्यावर लागल्या आणि तो जागीच ठार झाला. या घटनेनंतर मदनलाल हे तेथून पळून गेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. मदनलाल यांना कोर्टात कर्झनच्या हत्येचे कारण विचारण्यात आले, त्यावेळी ते म्हणाले, भारताला अमानवी ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी मी माझी भूमिका बजावली आहे. कर्झन वायलीच्या हत्येप्रकरणी मदनलाल यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. 17 ऑगस्ट 1909 रोजी ब्रिटिश तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली.

या क्रांतिकारी घटनेने आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी कर्झन वायलीची हत्या केल्यामुळे मदनलालचे वडील खूप संतापले होते. मदनलाल यांना फाशी दिल्यानंतर लंडनमधून त्यांच्या अस्थी भारतात आणल्या नव्हत्या. काही काळानंतर शहीद मदनलाल यांच्या अस्थी लंडनहून 13 डिसेंबर 1976 रोजी भारतात आणण्यात आल्या. 20 डिसेंबर 1976 रोजी अमृतसर येथे तत्कालीन मुख्यमंत्री ग्यानी झैल सिंह यांच्या उपस्थितीत शहीद मदनलाल यांच्या अस्थिंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारत मातेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या मदनलाल यांनी फासावर लटकवताना सांगितले की, 'माझ्या मातृभूमीसाठी मी माझे जीवन समर्पित करत आहे, याचा मला अभिमान आहे. भारत मातेचे रक्षण करण्यासाठी मला अनेक वेळा भारतीय म्हणून जन्म घ्यायचा आहे. अशा महान क्रांतिकारी शहीद मदनलाल धिंग्रा यांची आज जयंती. पुण्यतिथिनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget