एक्स्प्लोर
Advertisement
रेल्वे आता तिकिटावरील सबसिडी सोडण्याचं आवाहन करणार!
नवी दिल्ली : गॅस सबसिडीच्या धर्तीवर रेल्वे आता तिकिटावर दिली जाणारी सबसिडी सोडण्याचं आवाहन करणार आहे. रेल्वे तिकिटावर सध्या 43 टक्के सबसिडी दिली जाते. सबसिडी सोडण्यासाठी तिकीट बूक करतानाच पर्याय दिले जातील.
भारतीय रेल्वेही आता गिव्ह अप योजना सुरु करणार आहे. तिकीट बूक करताना रेल्वेकडून तीन पर्याय उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. पहिला पर्याय असेल पूर्ण सबसिडी सोडा, दुसरा अर्धी सबसिडी सोडा आणि तिसरा सबसिडी सोडायची नाही, असा पर्याय असेल.
समजा,
- दिल्ली-हावडा सुपरफास्ट ट्रेनचं स्लीपर क्लास तिकीट 630 रुपये आहे. तुम्हाला पूर्ण सबसिडी सोडायची असेल तर 1110 रुपये तिकीट द्यावं लागेल.
- एसी 3 क्लाससाठी पूर्ण सबसिडी सोडल्यानंतर 1670 ऐवजी 2930 रुपये द्यावे लागतील.
- एसी 2 क्लाससाठी पूर्ण सबसिडी सोडल्यानंतर 2 हजार 425 रुपयांऐवजी 4 हजार 255 रुपये मोजावे लागतील.
- एसी फर्स्ट क्लाससाठी पूर्ण सबसिडी सोडल्यानंतर 4 हजार 165 रुपयांऐवजी 7 हजार 310 रुपये मोजावे लागतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement