Indian Railway News: रेल्वेचा विना तिकीट प्रवास करताय? प्रवासादरम्यान कॅश नसेल तर घाबरू नका, हे वाचा
Indian Railway News: आजकालच्या डिजिटल युगात रेल्वे प्रवास करताना अनेक लोकांकडे पुरेशी रोख रक्कम नसते, ज्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना दंड भरणे कठीण होते. येत्या काही दिवसांत ही समस्या दूर होईल.
Indian Railway News : तुम्ही ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशात डिजिटल पेमेंटच्या वाढत्या ट्रेंडमुळे लोक त्यांच्या खिशात कमी पैसे ठेवू लागले आहेत. अनेकवेळा ट्रेनमध्ये प्रवास करताना रोख रकमेची गरज भासते, मात्र तुमच्याकडे रोख रक्कम नसेल तर त्यावर रेल्वेने उपाय शोधला आहे. खरे तर बरेच प्रवासी वैध तिकीट न घेताच ट्रेनमध्ये चढतात. पकडल्यावर त्यांच्याकडून दंड व भाडे वसूल करून प्रवासासाठी तिकीट काढले जाते.
प्रवासादरम्यान दंड भरण्यात अडचण
डिजिटल पेमेंटच्या वाढीमुळे, अनेक लोकांकडे पुरेशी रोख रक्कम नाही, ज्यामुळे त्यांना प्रवास करताना दंड भरणे कठीण होते. येत्या काही दिवसांत ही समस्या दूर होईल. प्रवासी डेबिट कार्डद्वारे भाडे आणि दंड भरण्यास सक्षम असतील. रेल्वे आता सर्व मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ट्रेनमध्ये टीटीईला 4-जी सिमसह पीओएस (पॉइंट ऑफ सेल) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वेटींग लिस्टमधील प्रवाशांना होईल फायदा
दुसरीकडे, टीटीईला अनेक गाड्यांमध्ये पीओएस देण्यात आले आहे, परंतु त्यात 2जी सिम असणे अडचणीचे आहे. अनेक ठिकाणी कमी नेटवर्कमुळे हे उपकरण काम करत नाही. राजधानी आणि शताब्दी ट्रेनमध्ये 4G सिम सुविधेसह POS ची सुविधा देण्यात आली आहे. लवकरच इतर मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्येही ही सुविधा TTE सोबत असेल. जेणेकरून त्यांना ट्रेनमधील उपलब्ध जागांची माहिती मिळू शकेल. याचा फायदा वेटींग लिस्टमधील प्रवाशांनाही होणार आहे.