Baba Ramdev : बाबा रामदेव यांचं अॅलोपॅथिक सायन्ससंबधी अवमानजनक वक्तव्य, इंडियन मेडिकल असोसिएशनकडून निषेध
बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी अॅलोपॅथिक सायन्स (Allopathic science) विषयी अवमानजनक भाषा वापरल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) त्यांचा निषेध केला आहे.
नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांवर केलेल्या अवमानजनक वक्तव्याचा निषेध केला आहे. राम कृष्ण यादव उर्फ स्वयंघोषित रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांबाबत जी अवमानजनक भाषा वापरली आहे त्याचा आम्ही निषेध करतो असं आएमए द्वारकाच्या वतीनं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.
कोरोना लढ्यात 1200 हून अधिक डॉक्टरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं आहे. त्यांच्या बाबा रामदेव यांनी अपमान केला आहे असंही या निवेदनात म्हटलं आहे. देश कोरोनाच्या भयंकर संकटाला तोंड देत असताना बाबा रामदेव यांनी वापरलेल्या अवमानजनक आणि असंस्कृत भाषेमुळे अनेक समस्त डॉक्टर वर्गाच्या कामामध्ये नकारात्मकता येऊ शकते असंही नमूद करण्यात आलं आहे.
Press Release
— Indian Medical Association Dwarka , Delhi (@IMAdwarka) May 21, 2021
Indian Medical Association Dwarka Strongly condemns Ram Kishan Yadav aka Self Proclaimed Baba Ramdev who has used derogatory words against Allopathic science & Medical Doctors .
He has belittled the sacrifice of more than 1200 Doctors who have laid their lives
आपल्या जीवाचा विचार न करता देशातील डॉक्टर कोरोनाच्या या काळात झोकून देऊन रुग्णांची सेवा करत आहेत आणि हे स्वयंघोषित व्यापारी बाबा त्यांच्याबद्दल चुकीची माहिती आणि तिरस्कार समाजात पसरवत आहे. तसंच बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावे डॉक्टर आणि रुग्णांच्या संबंधावर परिणाम होऊ शकतो असंही या निवेदनात म्हटलं आहे.
काय म्हणाले बाबा रामदेव?
सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये बाबा रामदेव अॅलोपॅथिक सायन्स विषयी अवमानजनक भाषा वापरताना दिसता आहेत. अॅलोपॅथी हा प्रकार म्हणजे मुर्खपणा आहे आणि तो दिवाळे काढणारा आहे असं बाबा रामदेव बोलताना दिसत आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये त्यांनी अॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही भाष्य केलं आहे.
ALLOPATHY STUPID OR DIWALIA SCIENCE?
— Dr Amarinder Singh Malhi MBBS/MD/DM@aiims_newdelhi (@drasmalhi) May 21, 2021
WHAT IS THIS?
STOP VIOLENCE A/G DOCTORS
Isn't he above in hierarchy?
Inko health minister banao.
I think time has come to make Ramdev ji incharge of Covid 19 in India 🇮🇳
Let him develop task force & take over as Covid man of India
(1/2) pic.twitter.com/6hajNItfOR
वादग्रस्त कोरोनिल औषध
गेल्या वर्षी कोरोनावर औषध सापडलं असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी केला होता. या औषधानं रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के आहे, असा दावा योगगुरु रामदेवबाबांनी केला होता. त्याला जागतिक आरोग्य संघटेनेने प्रमाणपत्र दिल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यावर पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटला जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणपत्र दिल्याची बातमी खोटी असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केलं होतं. तसंच या प्रकरणी आयएमएने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडेही स्पष्टीकरण मागितलं होतं.
महत्वाच्या बातम्या :