एक्स्प्लोर
Advertisement
राफेल विमान करार : भारताने फक्त रिलायन्सचं नाव सुचवलं : ओलांद
राफेल विमान करारासाठी भारत सरकारने फक्त अनिल अंबानींच्या 'रिलायन्स डिफेन्स'चंच नाव सुचवलं होतं, असा दावा फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी केला आहे
नवी दिल्ली : राफेल विमान करारावरुन फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी केलेल्या दाव्यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राफेल विमान करारासाठी भारत सरकारनेच अनिल अंबानींच्या 'रिलायन्स डिफेन्स'चं नाव सुचवल्याचं फ्रान्सने सांगितलं.
भारत सरकारकडून 'रिलायन्स डिफेन्स' हे एकच नाव आल्यामुळे देसॉ एव्हिएशनकडे दुसरा पर्यायच नव्हता, असा दावा फ्रान्स्वा ओलांद यांनी केला आहे. फ्रान्सच्या एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत ओलांद यांनी ही बाजू मांडली आहे.
गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है : राहुल गांधी
यापूर्वी राफेल विमान करार हा दोन खासगी कंपन्यातील करार असून त्यात सरकारची कुठलिही भूमिका नाही, असं केंद्र सरकारने म्हटलं होतं. मात्र, ओलांद यांच्या दाव्यानंतर सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालयाने मात्र ओलांद यांच्या दाव्यातील तथ्य तपासून पाहत असल्याचं म्हटलं आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्वीट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदींनी भारतीयांचा विश्वासघात केला असून अनेक जवानांच्या रक्ताचा अवमान केला आहे, अशी टीकाही राहुल यांनी केली आहे.The report referring to fmr French president Mr. Hollande's statement that GOI insisted upon a particular firm as offset partner for the Dassault Aviation in Rafale is being verified. It is reiterated that neither GoI nor French Govt had any say in the commercial decision.
— Defence Spokesperson (@SpokespersonMoD) September 21, 2018
फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्यासोबत मोदींनी पॅरिसला एप्रिल 2015 मध्ये चर्चा केली होती. त्यानंतर सप्टेंबर 2016 मध्ये 36 राफेल विमानांच्या खरेदीचा करार झाला.The PM personally negotiated & changed the #Rafale deal behind closed doors. Thanks to François Hollande, we now know he personally delivered a deal worth billions of dollars to a bankrupt Anil Ambani.
The PM has betrayed India. He has dishonoured the blood of our soldiers. — Rahul Gandhi (@RahulGandhi) September 21, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement