India Pakistan Nuclear weapons: पाकिस्तानची आण्विक अस्त्रं नष्ट करण्यासाठी भारतीय वायूदलाने हल्ला केल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची घाईघाईत मध्यस्थी: न्यूयॉर्क टाईम्स
Pakistan nuclear weapons: पाकिस्तान त्यांच्याकडे असणाऱ्या अणवस्त्रांचे रक्षण करु शकत नाही, असे मत प्रसिद्ध युद्ध इतिहासकार टॉम कूपर यांनी व्यक्त केले होते.

India Pakistan War: भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य स्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घाईघाईत न विचारता केलेल्या मध्यस्थीवर 'न्यूयॉर्क टाईम्स'दैनिकाने टीका केली आहे. दिल्लीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना नोबेल पारितोषिक मिळवण्याची घाई झाल्याची चर्चा रंगली आहे, असेही न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे. ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यावर भारत कमालीचा नाराज झाला असेही न्यूयॉर्क टाईम्सच्या लेखात म्हटले आहे. खरंतर आधी अमेरिका या प्रश्नात पडण्यास इच्छूक नव्हता. मात्र, भारताने पाकिस्तानच्या आण्विक अस्त्र भांडारावर (Nuclear Weapons) मारा केल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी यात लक्ष घातलं आणि युद्धविरामाची घाई केली, असे या लेखात म्हटलंय. भारत हा राजनैतिकदृष्ट्या अमेरिकेच्या जवळ आला आहे. भारत अनेक शस्त्रास्त्र अमेरिकेकडून खरेदी करतो. तरी जेव्हा पाकिस्तनचा प्रश्न येतो तेव्हा मात्र चीन (China) आणि अमेरिका एकाच पेजवर येतात, असे 'न्यूयॉर्क टाईम्स'च्या लेखात म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर सातत्याने भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या अणवस्त्रांचा साठा असलेल्या किराना हिल्सवर हल्ला केल्याची चर्चा होती. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील एअर बेसवर हल्ला केला होता. त्यावेळी पाकिस्तान घाबरला होता. कारण, तिथून जवळच काही अंतरावर किराना हिल्स येथे पाकिस्तानच्या अणवस्त्रांचा साठा आहे, असे सांगितले जात होते. भारताने याठिकाणी हल्ला केल्यामुळेच पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी इतक्या लवकर राजी झाला, अशीही चर्च होती. याविषयी भारतीय वायूदलाचे एअर मार्शल ए.के. भारती यांना विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी किराना हिल्सवर भारतीय वायूदलाने हल्ला केल्याची बाब नाकारली होती. किराना हिल्स येथे पाकिस्तानचा अणवस्त्र साठा आहे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद, आम्हाला त्याबद्दल माहिती नव्हती. आम्ही किराना हिल्सवर हल्ला केलेला नाही, जे काही आहे ते हेच, असे एअर मार्शल ए.के. भारती यांनी सांगितले होते.
काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून दहशतवाद्याला कंठस्नान
जम्मू-काश्मीरमधील त्राल येथे गुरुवारी भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांची चकमक झाली. अवंतीपोरा येथील त्राल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली. यानंतर भारतीय सैन्याने या परिसराला घेरले तेव्हा दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. आतापर्यंत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले आहेत. तर आणखी दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारतीय सैन्याकडून त्राल परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.
आणखी वाचा
भारताने पाकिस्तानच्या अणवस्त्र ठिकाणाजवळ हल्ला केला का? एअर मार्शल भारतींचे मजेशीर उत्तर























