भारतीय लष्करप्रमुख बांगलादेशच्या तीन दिवसीय दौऱ्यावर, संरक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
Indian Army: भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध आणखी चांगले करण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे हे 18 ते 20 जुलै 2022 या कालावधीसाठी बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.
Indian Army chief General Manoj Pande: भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध आणखी चांगले करण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे हे 18 ते 20 जुलै 2022 या कालावधीसाठी बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. लष्करप्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.
18 जुलै 2022 रोजी शिखा अनिर्बन येथे पुष्पहार अर्पण करून 1971 च्या मुक्तिसंग्रामात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली देऊन लष्करप्रमुख आपल्या दौऱ्याची सुरुवात करतील. लष्करप्रमुख सुरक्षा आस्थापनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका आणि संरक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. तसेच बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान स्मारक संग्रहालयाला भेट देऊन ते श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी लष्करप्रमुख मीरपूरच्या डिफेन्स सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना संबोधित करतील. त्यानंतर ते बांगलादेशातील एक प्रमुख संस्था जी संयुक्त राष्ट्रांच्या विविध शांतता मोहिमांमध्ये रोजगारासाठी शांती सैनिकांना प्रशिक्षण देते अशा "बांग्लादेश इन्स्टिट्यूट ऑफ पीस सपोर्ट अँड ऑपरेशन ट्रेनिंग (BIPSOT)" या संस्थेला भेट देऊन या सदस्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते मीरपूर येथील बंगबंधू लष्करी संग्रहालयाला भेट देतील. लष्कर प्रमुखांच्या भेटीमुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील. दोन्ही देशांमधल्या सामायिक मुद्द्यांवर समन्वय आणि सहकार्य निर्मितीसाठी ही भेट महत्त्वाची ठरेल.
महत्वाच्या बातम्या
Jagdeep Dhankhar : मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत पंगा, उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनकड यांच्या राज्यपाल कारकिर्दीतील 10 वाद
Cheetah In India: सात दशकानंतर भारताच्या जंगलांमध्ये पुन्हा दिसणार चित्ता, ऑगस्टमध्ये चित्त्याचे दर्शन होण्याची शक्यता